डोंबिवलीत पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ, दोन दिवसात पाच ठिकाणी चैन स्नॅचिंग

दोन दिवसात पोलिसांनी तीन पादचाऱ्यांची लूट तर दोन ठिकाणी चैन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

डोंबिवलीत पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ, दोन दिवसात पाच ठिकाणी चैन स्नॅचिंग
डोंबिवलीत पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ
Image Credit source: Google
वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Sep 24, 2022 | 10:44 PM

डोंबिवली / सुनील जाधव (प्रतिनिधी) : डोंबिवलीतील पादचाऱ्यांना लुटण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. लुटारुंनी लागोपाठ पाच ठिकाणी पादचाऱ्यां (Pedestrians)ना लुटून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. विशेष म्हणजे लुटारूंना बळी पडलेल्यांमध्ये महिलांची संख्या जास्त असल्याचे दिसून येते. दोन दिवसात पोलिसांनी तीन पादचाऱ्यांची लूट (Loot) तर दोन ठिकाणी पाच चैन स्नॅचिंग (Chain Snatching)चे गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

घटना खालीलप्रमाणे

डोंबिवली पूर्व सार्वजनिक रोड टिळकनगरमधील ध्वनी सोसायटीत राहणारे 59 वर्षीय अशोक हरिभाऊ खिलारी हे मानव कल्याण केंद्राच्या गल्लीतून जात होते. बोलण्याच्या नादात भुरळ घालून सदर रिक्षावाल्याने अशोक यांच्या पिशवीतून 10 हजारांची रोकड काढून पलायन केले.

सायंकाळी डोंबिवली पूर्वेकडील संत नामदेव पथ सुविधा सोसायटीत राहणाऱ्या 65 वर्षीय वनिता कुडतडकर या शेजारी राहणाऱ्या महिलेसह भाजी खरेदी करून चालल्या होत्या. रॉकेल डेपोच्या गल्लीत दुचाकीवरून आलेल्या दोघा लुटारुंनी वनिता यांना थाप मारून त्यांच्या गळ्यातील 4 ग्रॅम वजनाची 15 हजार रुपये किंमतीची चैन खेचून पोबारा केला.

डोंबिवली रामनगर परिसरातील श्रीस्नेह सोसायटीत राहणाऱ्या 52 वर्षीय सुजाता श्रीनिवास जिनराळ या टाटा पॉवर लाईनखालून रात्री नऊच्या सुमारास पतीसह जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या लुटारूंनी सुजाता यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे 75 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून धूम ठोकली.

कल्याण शीळ रोड परिसरात 39 वर्षीय शुभांगी शिंदे नावाच्या महिला 22 तारखेला दुपारी साडे तीनच्या सुमारास एचडीएफसी बँकेमधून काढून रिक्षाची वाट पाहत होत्या. शुभांगी यांनी बँकेतून दोन लाख दहा हजार रुपये तसेच त्यांच्याजवळील 4 हजार रुपये असे दोन लाख 14 हजार रुपये आपल्याजवळील कापडी पिशवीत ठेवले होते. यावेळी मागून आलेल्या दुचाकीवरून लुटारूंनी त्यांच्या हातातली पिशवी घेऊन पळ काढला.

डोंबिवलीतील मानपाडा रोड परिसरात राहणाऱ्या 75 वर्षीय विमल सोरटे हे कामावरून सुटून डोंबिवली चार रस्त्यावरून चालत जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांना ओळख असल्याचे भासवले. त्यानंतर त्यांना बोलण्यात गुंतवून अंगावरील दागिने एका कपड्यात बांधण्यास सांगत एका पिशवीत टाकल्याचे भासवून घेऊन आरोपी फरार झाले.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें