बोल बच्चन गँग अखेर जेरबंद, बोलण्यात गुंतवून नागरिकांना लुटायचे आणि पसार व्हायचे

पोलिसांनी या आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीमध्ये हे त्रिकूट कैद झाले होते. त्याआधारे पोलिसांनी त्यांचा शोध घेत मुसक्या आवळल्या.

बोल बच्चन गँग अखेर जेरबंद, बोलण्यात गुंतवून नागरिकांना लुटायचे आणि पसार व्हायचे
टिटवाळ्यात महिलेला मारहाण
Image Credit source: tv9
वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Sep 24, 2022 | 9:53 PM

मुंबई : बोल बच्चन करून नागरिकांना लुटणाऱ्या त्रिकुटाला मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या (Arrest) आहेत. या त्रिकुटावर आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यांमध्ये शंभर गुन्हे (Case) दाखल आहेत. गेल्या दोन महिन्यात घाटकोपर ते मुलुंड या परिसरात बोलबच्चन गॅंगने लुटण्याचा (Loot) पाच घटना घडल्या होत्या. त्यामुळे या वाढत्या प्रकारांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी विविध पथके नेमली होती.

सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार

पोलिसांनी या आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीमध्ये हे त्रिकूट कैद झाले होते. त्याआधारे पोलिसांनी त्यांचा शोध घेत मुसक्या आवळल्या. हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. संजय मागडे, रमेश जयस्वाल, नरेश जयस्वाल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

काही दिवसांपूर्वी मुलुंडमध्ये वृद्धाला लुटले होते

काही दिवसांपूर्वी मुलुंडच्या एस एल रोडवर एका वरिष्ठ नागरिकाला बोलण्यात अडकवून काही मिनिटात त्याच्याकडील मुद्देमाल लुटून चोरट्यांनी पोबारा केला होता. दागिने आणि रोख रक्कम मिळून एक लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वारंवार जागा बदलायचे

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी हे तिघे वारंवार जागा बदलत होते. गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईमध्ये वेगवेगळ्या लॉजमध्ये आरोपी राहत असल्याचे पोलिसांना कळले. त्यानुसार पोलिसांनी एका लॉजवर छापा टाकून या तिघांच्या मुसक्या आवळल्या.

आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल जप्त

आरोपींकडून मुलुंडमध्ये चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यासोबतच परिमंडळ 7 परिसरात अशाच प्रकारचे पाच गुन्हे त्यांनी केले असल्याची कबुली दिली. तिघांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये शंभर पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. अटकेची कारवाई झाल्यानंतर जेलमधून बाहेर पडल्यावर पुन्हा त्यांचा हा शिरस्ता सुरू होतो.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें