‘दृश्यम’ स्टाईल हत्याकांड! तरुणाने रचलेला मित्राच्या हत्येचा कट एकून बसेल धक्का
एका तरुणाची त्याच्या मित्राने हत्या केली. आरोपीने ‘दृश्यम’ चित्रपटातील कथेप्रमाणे डाव आखला होता. त्याने नेमकं काय केलं हे चला जाणून घेऊया...

मध्य प्रदेशातील इंदौरच्या खूडेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘दृश्यम’ चित्रपटाप्रमाणे एका तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह तलावाजवळील खड्ड्यात पुरण्यात आला. घटनेनंतर 15 दिवसांनी पोलिसांनी या हत्याकांडाचा पर्दाफाश करत मुख्य आरोपी रोहित आणि त्याच्या काही साथीदारांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या रोहितने पोलिसांना सांगितले की, मृत विशालच्या बहिणीशी त्याचे प्रेमसंबंध होते. यामुळे विशालने त्याला धमकी दिली होती की, जर तो त्याच्या बहिणीच्या जवळ दिसला तर तो त्याला ठार मारेल.
‘दृश्यम’ चित्रपटापासून प्रेरणा
रोहितने विशालला मार्गातून हटवण्यासाठी ‘दृश्यम’ चित्रपटाप्रमाणे हत्येचा कट रचला. चित्रपटात अजय देवगन ज्या पद्धतीने हत्येनंतर मृतदेह लपवतो, त्याचप्रमाणे रोहितने विशालला भेटण्यासाठी बोलावले. यावेळी रोहितचा मित्र विक्रमही त्याच्यासोबत होता. विशाल आल्यानंतर रोहित आणि विक्रम यांनी त्याच्याशी भांडण केले. त्यांच्याकडील पिस्तूलाने विशालवर गोळीबार केला. वाचा: मित्रच बनला शत्रू! महिलेच्या फ्लॅटवर पोहोचला, गळ्या जवळ…; पोलिसांना कळताच थरकाप उडाला
मृतदेह खड्ड्यात पुरला
गोळीबारात विशालचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी खूडेल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तलावाजवळ खड्डा खणला आणि त्यात विशालचा मृतदेह पुरला. एवढेच नाही, तर त्यांनी विशालच्या मोबाइलवरून त्याच्या कुटुंबीयांना मेसेज पाठवला की, तो काही दिवसांसाठी सांवरिया सेठला फिरायला जात आहे. यानंतर त्यांनी तो फोन सांवरिया सेठला जाणाऱ्या बस मध्ये ठेवला.
कुटुंबीयांची तक्रार आणि पोलिसांचा तपास
विशाल अनेक दिवस घरी परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी खूडेल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विशालच्या मोबाइल लोकेशनच्या आधारे तपास सुरू केला, परंतु त्याची लोकेशन अनेक ठिकाणी दिसून आली. दरम्यान, काही लोकांनी पोलिसांना सांगितले की, घटनेच्या दिवशी विशाल रोहितला भेटण्यासाठी गेला होता. यानंतर पोलिसांनी रोहितला ताब्यात घेतले. कठोरपणे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींना अटक
या प्रकरणात पोलिसांनी रोहित आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. डीएसपी उमाकांत चौधरी यांनी सांगितले की, घटनेनंतर 15 दिवसांनी पोलिसांनी या प्रकरणाचा पूर्ण पर्दाफाश केला. ज्या ठिकाणी आरोपींनी हत्या करून मृतदेह खड्ड्यात पुरला होता, तिथून तो बाहेर काढण्यात आला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी इंदौरच्या रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पकडलेल्या आरोपींकडून सखोल चौकशी सुरू आहे.
