AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonam Raghuvanshi : राज कुशवाह फक्त एक प्यादा, सोनमच्या आयुष्यात तिसराच पुरुष…नवीन धक्कादायक खुलासा

New Character In Raja Raghuvanshi Case: इंदूरच्या राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात एक नवीन अँगल समोर आलाय, जो खरच हैराण करुन सोडणारा आहे. पोलीस सूत्रांनुसार या हत्याकांडाची मुख्य मास्टरमाइंड सोनमच आहे. राज कुशवाहचा फक्त एका मोहऱ्यासारखा वापर झाला. या प्रकरणात अजून मोठे धक्कादायक खुलासे होऊ शकतात.

Sonam Raghuvanshi : राज कुशवाह फक्त एक प्यादा, सोनमच्या आयुष्यात तिसराच पुरुष...नवीन धक्कादायक खुलासा
raja raghuvanshi murder case
| Updated on: Jun 12, 2025 | 9:24 AM
Share

इंदूरच्या राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. पत्नी सोनमसह राजाची हत्या करणारे सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत. आता या हत्या प्रकरणात एक नवीन टि्वस्ट आलं आहे. आतापर्यंतच्या तपासात हे स्पष्ट झालय की, सोनम रघुवंशीने राज कुशवाह आणि तीन आरोपींसोबत मिळून राजा रघुवंशीची हत्या केली. हे सर्व यासाठी कारण, विधवा झाल्यानंतर तिला राज कुशवाहशी लग्न करायचं होतं. पण पोलिसांना आता तिसऱ्या व्यक्तीचा संशय येतोय. पोलीस सूत्रांच्या मते, राज कुशवाह फक्त एक मोहरा होता. सोनमने फक्त हत्येसाठी राजाचा वापर केला. एकाबाजूला सोनम राज कुशवाह हत्येचा मास्टरमाइंड असल्याच सांगत आहे. दुसरीकडे राज सोनमच हे सर्व कारस्थान असल्याच सांगत आहे. दोघे परस्परांवर आरोप करत आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार सोनमच या सर्व प्रकरणाची मुख्य मास्टरमाइंड आहे. राजाचा फक्त एक प्यादा म्हणून वापर झाल्याच मानलं जातय. सर्व आरोपींच्या चौकशीवर लक्ष ठेऊन असणारे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, असं दिसून येतय की, सोमनने सर्वांचा राजाच्या हत्येसाठी वापर केला. राज कुशवाहला प्रेमाच आश्वासन दिलं, तर अन्य तिघांना पैशांच आमीष दाखवलं.

हा तिसरा व्यक्ती कोण?

आतापर्यंत असं मानलं जात होतं की, राजच या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य कारस्थानकर्ता आहे. अजूनपर्यंत तरी, त्याच्याकडे सोनमचा बॉयफ्रेंड म्हणून पाहिलं जातय. या प्रकरणात अजून मोठा खुलासा होऊ शकतो असं सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं जातय. सोनम कुठल्या तिसऱ्या व्यक्तीसोबत पळून जाण्याच्या तयारीत होती, असा पोलिसांना संशय आहे. राज कुशवाहला या मोठ्या गेमबद्दल काहीच माहित नाहीय. म्हणून तो सोनम रघुवंशीची मदत करत होता. आता हा तिसरा व्यक्ती कोण? याचा खुलासा होण अजून बाकी आहे.

मग तिने कोणासाठी पतीची हत्या केली?

सोनमच कुटुंब आणि प्लायवूड कंपनीत काम करणारे लोक वारंवार हेच सांगत आहेत की, सोनम आणि राज यांच्यामध्ये प्रेमसंबंध नव्हते. राज सोनमला दीदी बोलायच हेच सोनमचा भाऊ गोविंदने सांगितलं. तीन वर्षांपासून सोनम त्याला राखी बांधत होती. आता प्रश्न यामध्ये असा निर्माण होतो की, सोनम आणि राजमध्ये असे प्रेमसंबंध नव्हते, मग तिने कोणासाठी पतीची हत्या केली?.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.