Raja Raghuvanshi Murder Case : रक्तबंबाळ राजा व्हिवळत होता, तरीही सोडून गेली.. मग सोनम परत का आली ?
Raja Raghuvanshi Case New Revelation : राजा रघुवंशी मर्डर केसप्रकरणात सहभागी असलेली त्याची पत्नी सोनम हिच्यासह चार आरोपींना अटक करण्यात आली असून 5 जण गजाआड आहेत. ती तुरुंगात प्रत्येक क्षणी अस्वस्थपणे फिरत असते. सीसीटीव्ही कॅमेरे 24 तास तिच्यावर लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणात पोलिसांना दररोज नवीन माहिती मिळत आहे. आता आणखी एक हादरवणारी माहिती पोलिसांसमोर आली आहे.

देशभरात गाजत असलेल्या राजा रघुवंशी हत्याप्रकरणात रोज जी नवी माहिती समोर येते ती हादरवणारी आहे. राजाची पत्नी सोनम हिनेच प्लान आखून इतरांसह मिळून त्याची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी सोनमसह एकूण 5 जणांना अटक केली आहे. शिलाँग पोलिस याप्रकरणाचा कसून तपास करत असून याचसंदर्भात चौकशीसाठी पोलिस बुधवारी सोनमच्या घरी पोहोचले होते. इंदौर क्राइम ब्रांचचे पथकही त्यांच्यासोबत होते. पोलिसांनी तिच्या घरच्या लोकांची कसून चौकशी केली. पतीच्या हत्येचा प्लान आखणारी सोनम सध्या तुरुंगात कैद असून तिला 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम तुरुंगात खूप अस्वस्थ असते. सीसीटीव्हीद्वारे पोलिसांचं तिच्यावर 24 तास लक्ष असतं. याच प्रकरणात आता पोलिसांना आणखी एक हैराण करणारी गोष्ट कळली आहे.
एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ज्या दिवशी म्हणजे 23 मेला राजाची हत्या करण्यात आली तेव्हा तो रक्तबंबाळ अवस्थेत, वेदनेने व्हिवळत असताना सोनम त्याला तेथेच सोडूनपळून गेली होती. राजा मृत झाला, हे कळल्यावरच ती परत आली. हल्लेखोराने राजावर पहिला वार केला तेव्हा सोनम रघुवंशी घटनास्थळावरून पळून गेली होती, असे सांगण्यात येत आहे. राजाला कुऱ्हाडीने मारताच, प्रचंड रक्त वाहू लागलं. हे पाहून सोनम ओरडली. मग ती तिथून पळून गेली. अनेक वेळा हल्ला झाल्यानंतर, राजा मरण पावला, तेव्हाच ती परतली. सोनम पळून गेल्यानंतरही विशाल आणि इतर हल्लेखोरांनी राजावर कुऱ्हाडीने हल्ला करत राहिले.
5 जणांनी घेतला राजाचा जीव
जिथे राजाची हत्या झाली, मंगळवारी मेघालय पोलिस त्याच गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचले. तिथेच सोनमसह इतर आरोपींनी राजा रघुवंशीची हत्या केली होती. मेघालय पोलिसांनी आणखी एक शस्त्र सापडल्याची पुष्टी केली. हे शस्त्र देखील राजाला मारण्यासाठी वापरले गेले होते. गुन्ह्याच्या ठिकाणी जाऊन सीन रीक्रिएट केल्यानंतर आता हे चित्र बऱ्याच प्रमाणात स्पष्ट झाले आहे, असं मेघालय पोलिसांनी सांगितलं. विशाल उर्फ विक्कीने राजा रघुवंशीवर पहिला वार केला. राजाला लागल्यावर खूप रक्त आलं आणि सोनम तिथून हटली. त्यानंतर, तिन्ही आरोपींनी मृतदेह खाली फेकून दिला.
प्रत्येत अँगलने तपास सुरू
एएसपी विवेक सय्यम म्हणाले की, सोनमने आधीच गुन्हा कबूल केला आहे. आज आम्ही गुन्ह्याचे दृश्य (क्राईम सीन रीक्रिएशन) पुन्हा तयार केले आणि ती कुठे उभी होती, तिची भूमिका काय होती ते पाहिले. आज सर्व काही समोर आले आहे. अंतिम निर्णयापर्यंत पोहोचण्यापूर्वी आम्ही प्रत्येक कोनातून प्रकरणाची चौकशी करत आहोत असेही ते म्हणाले.
