शारीरिक संंबंधांनी कर्करोग बरा करण्याचा दावा, हॉटेलमध्ये डॉक्टर अर्धनग्नावस्थेत सापडला

डॉ. मिनीलो रुग्णांना "सेक्स उपचार" देत असल्याचा आरोप एका पीडित महिलेने केल्यानंतर इटालियन टीव्ही शो 'ले आयन' (Le Iene) च्या पत्रकारांनी त्याचे स्टिंग ऑपरेशन केले. संबंधित स्त्री तिच्या प्रजननविषयक समस्यांबद्दल तक्रार घेऊन त्याच्याकडे गेली होती.

शारीरिक संंबंधांनी कर्करोग बरा करण्याचा दावा, हॉटेलमध्ये डॉक्टर अर्धनग्नावस्थेत सापडला

रोम : ‘डॉ मॅजिक फ्लूट’ (Dr Magic Flute) या टोपणनावाने ओळखला जाणारा इटालियन स्त्रीरोगतज्ज्ञ (gynecologist) महिला रुग्णासोबत अर्धनग्न अवस्थेत सापडला. सेक्स केल्याने ती बरी होईल, असा दावा त्याने केला होता. 60 वर्षीय डॉ जिओव्हानी मिनीलो (Dr Giovanni Miniello) एका हॉटेलच्या खोलीत संबंधित महिलेसह रंगेहाथ पकडला गेला.

काय आहे प्रकरण?

डॉ. मिनीलो रुग्णांना “सेक्स उपचार” देत असल्याचा आरोप एका पीडित महिलेने केल्यानंतर इटालियन टीव्ही शो ‘ले आयन’ (Le Iene) च्या पत्रकारांनी त्याचे स्टिंग ऑपरेशन केले. संबंधित स्त्री तिच्या प्रजननविषयक समस्यांबद्दल तक्रार घेऊन त्याच्याकडे गेली होती. तिच्यामध्ये कर्करोगजन्य मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) या लैंगिक संबंधातून प्रसार होणाऱ्या डीएनए (DNA) विषाणूची लक्षणं असल्याचं डॉक्टरने सांगितलं होतं.

15 महिलांचे डॉक्टरवर आरोप

“मी अनेक महिलांना कॅन्सरपासून वाचवले आहे. माझे जिच्यासोबत संबंध येतात, तिच्या चाचण्या नंतर नकारात्मक येतात” असा दावा या डॉक्टरने तिला केला. दाक्षिणात्य इटालियन शहरातील बारी येथे डॉक्टरने प्रॅक्टिस करतो. स्टिंग ऑपरेशन प्रसारित झाल्यापासून इतर 15 महिलांनी अशाच प्रकारे आपली फसवणूक झाल्याचे आरोप केले आहेत.

स्टिंग ऑपरेशनमध्ये 33 वर्षीय महिला अंडरकव्हर एजंट सहभागी झालेली होती. गर्भधारणा होत नसल्याने सल्ला घेण्याच्या बहाण्याने तिने त्याच्याशी संपर्क साधला असता, HPV साठी गर्भाशय तपासणी करण्याचा सल्ला त्याने दिला.

पीडितेची टीव्ही शो निर्मात्यांकडे तक्रार

डॉक्टर सुरुवातीपासूनच आपल्याशी अनप्रोफेश्नली वागत होता, त्याने कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय आपल्या स्तनांना स्पर्श केला आणि लहान आकाराचे स्तन असलेल्या स्त्रिया आपल्याला आवडत असल्याचे त्याने सांगितलं. जेव्हा तिने चाचण्याच्या निकालांसाठी डॉक्टरशी संपर्क साधला, तेव्हा त्याने आपण तुझ्याशी लैंगिक संबंध ठेवून तुला बरी करु शकतो असं सांगत भेटण्याची ऑफर दिली.

स्टिंग ऑपरेशनमध्ये डॉक्टर सापडला

महिलेने हा संवाद रेकॉर्ड करुन संबंधित शोच्या प्रमुखांना पाठवला. शोच्या निर्मात्यांनी एका अभिनेत्रीच्या माध्यमातून डॉक्टरशी संपर्क साधला आणि तशाच पद्धतीची लक्षणं सांगितली. त्यावर डॉक्टरने अपेक्षेप्रमाणे तोच पर्याय सुचवला. त्यानुसार हॉटेलमध्ये दोघांची भेटीची वेळ ठरली. डॉक्टरने आपले कपडे काढण्यास सुरुवात करताच काही पत्रकार तिथे पोहोचले. त्यावरही डॉक्टरने हे शास्त्रशुद्ध उपचार असल्याचा पवित्रा घेतला होता.

डॉ. मिनीलोने त्याच्या वकिलामार्फत सांगितले की “मी 40 वर्षांहून अधिक काळ शेकडो महिलांवर यशस्वीपणे उपचार केले आहेत. हा एक परिणामकारक पर्यायी उपचार आहे”

संबंधित बातम्या :

कुर्ल्यात 20 वर्षीय तरुणीची बलात्कारानंतर हत्या, इन्स्टा व्हिडीओ शूटिंगसाठी गेलेल्या तरुणांना आढळला मृतदेह

भिंतीवर सुसाईड नोट, कुटुंबातील पाच जणांसह कुत्र्यालाही विष दिलं, आजी-नातीचा मृत्यू

मैत्रिणींसमोर ‘चरसी’ म्हटल्याचा राग, कॉलेज विद्यार्थ्यांची मारहाण, नवी मुंबईत तरुणाची आत्महत्या

Published On - 2:10 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI