AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaipur : जयपूरच्या सिनेस्टार सिनेमा हॉलला भीषण आग, इमारतीत लोक अडकली असल्याची भीती

जयपूरच्या (Jaipur) विद्याधर नगरमध्ये सिनेस्टार सिनेमा हॉलला (Cinema Hall) भीषण आग लागली होती. आगीमुळे घटनास्थळी घबराट पसरली आहे. तळघरात आग लागली होती. अपघाताची माहिती पोलीस (Police) आणि अग्निशमन दलाला देण्यात आली.

Jaipur : जयपूरच्या सिनेस्टार सिनेमा हॉलला भीषण आग, इमारतीत लोक अडकली असल्याची भीती
जयपूरच्या सिनेस्टार सिनेमा हॉलला भीषण आगImage Credit source: twitter
| Updated on: Apr 23, 2022 | 3:32 PM
Share

नवी दिल्ली – जयपूरच्या (Jaipur) विद्याधर नगरमध्ये सिनेस्टार सिनेमा हॉलला (Cinema Hall) भीषण आग लागली होती. आगीमुळे घटनास्थळी घबराट पसरली आहे. तळघरात आग लागली होती. अपघाताची माहिती पोलीस (Police) आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. तात्काळ अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. इमारतीत काही लोक अडकले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

सिनेमा हॉलमध्ये खळबळ उडाली होती

मिळालेल्या माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीमुळे सिनेमा हॉलमध्ये खळबळ उडाली होती. ही माहिती अग्निशमन विभागाला तात्काळ देण्यात आली. त्याचबरोबर तिथून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. बचाव कार्यासाठी पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग लागल्यानंतर स्थानिक पोलीस सुध्दा घटनास्थळी पोहोचले आहेत. जमलेल्या लोकांना घटनास्थळावरून हटवण्यात आले आहे. यानंतर अग्निशमन दलाचे पथक सिनेमागृहाच्या तळघरात पोहोचले. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आहे.

लाखो रुपयांचा माल पूर्णपणे जळून खाक झाला आहे

त्याचवेळी ग्रेटर नोएडातील बिसरख येथील हायराईज सोसायटीमध्ये आग लागली. सोसायटीच्या 17 व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागली. त्यामुळे अग्निशमन दलाच्या पथकालाही तेथेही पाचारण करण्यात आले. ही घटना पाम ऑलिम्पिया सोसायटीत घडली आहे. आगीमुळे फ्लॅटमध्ये ठेवलेला लाखो रुपयांचा माल पूर्णपणे जळून खाक झाला. या घटनेचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात आले.

Krishna Prakash met Sharad Pawar : बदलीनंतर आयर्नमॅन कृष्णप्रकाश यांनी गोविंदबागेत घेतली शरद पवारांची भेट

Krishna Prakash met Sharad Pawar : बदलीनंतर आयर्नमॅन कृष्णप्रकाश यांनी गोविंदबागेत घेतली शरद पवारांची भेट

Navneet Rana Films Video: संजय राऊतांच्या ‘C’ ग्रेड अटॅकनंतर नवनीत राणांचे हे चार व्हिडीओ का चर्चेत आहेत ?

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.