बदली रोखण्यासाठी कृष्णप्रकाश यांच्या हालचाली? गोविंदबागेत जाऊन शरद पवारांची भेट, पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात चर्चा

आयर्नमॅन म्हणून परिचित असलेले आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश (Krishna Prakash) यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भेट घेतली.

बदली रोखण्यासाठी कृष्णप्रकाश यांच्या हालचाली? गोविंदबागेत जाऊन शरद पवारांची भेट, पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात चर्चा
शरद पवार/कृष्णप्रकाशImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 3:30 PM

पुणे : आयर्नमॅन म्हणून परिचित असलेले आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश (Krishna Prakash) यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भेट घेतली. पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदावरून आता त्यांची बदली झाली आहे. आज सकाळी कृष्णप्रकाश अचानकच गोविंदबाग (Govind Baug) येथे आले आणि त्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. दोघांमध्ये जवळपास दहा ते पंधरा मिनिटे संवाद सुरू होता. आता त्यांनी नेमकी कोणत्या विषयावर चर्चा केली, हे मात्र समजू शकलेले नाही. नेमकी काय चर्चा झाली याची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. ही खासगी भेट होती अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली, त्यानंतर ते तेथून निघून गेले.

कृष्णप्रकाश यांना नव्हती बदलीची कल्पना?

शरद पवार यांनाही माध्यमांशी यावेळी संवाद साधला नाही. त्यांना कोल्हापूरला जायचे असल्याने ते त्याच कामात होते. दुसरीकडे, अंकुश शिंदे यांनी पदभारही स्वीकारल्याने आता या भेटीचे नेमके काय कारण असू शकेल, याचीही चर्चा सुरू झाली होती. कृष्णप्रकाश यांना या बदलीबाबत कोणतीही माहिती नव्हती, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण बदली झाली तेव्हा ते परदेशात होते. या सर्व मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर तर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली नसावी ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.

आणखी वाचा :

Chandrakant Patil Vs Shivsena : राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं वातावरण महाविकास आघाडीकडूनच, चंद्रकांत पाटलांचा पुण्यात टोला

Pune Neelam Gorhe : नवनीत राणा आणि रवी राणा हे भाजपाचे भाडोत्री शेंदाडशिपाई; हनुमान चालिसावरून नीलम गोऱ्हेंचा बाण

Supriya Sule : किती हल्ले झाले, मात्र मुख्यमंत्र्यांनी शब्दही काढला नाही, त्यांच्या सुसंस्कृतपणाचा अभिमान; सुप्रिया सुळेंकडून कौतुक

Non Stop LIVE Update
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.