Navneet Rana Films Video: संजय राऊतांच्या ‘C’ ग्रेड अटॅकनंतर नवनीत राणांचे हे चार व्हिडीओ का चर्चेत आहेत ?

मुंबईः भाजपाला मार्केटिंगसाठी असे सी ग्रेड स्टार लागतात, अशी झोंबणारी टीका काल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी केली आणि त्यानंतर सोशल मीडियावर नवनीत राणा यांचे काही व्हिडिओ चांगलेच चर्चेत आले आहेत. राजकारणात येण्यापूर्वी मॉडेलिंगच्या करिअरमध्ये असलेल्या नवनीत राणा यांचे हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत . अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet […]

Navneet Rana Films Video: संजय राऊतांच्या 'C' ग्रेड अटॅकनंतर नवनीत राणांचे हे चार व्हिडीओ का चर्चेत आहेत ?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 3:04 PM

मुंबईः भाजपाला मार्केटिंगसाठी असे सी ग्रेड स्टार लागतात, अशी झोंबणारी टीका काल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी केली आणि त्यानंतर सोशल मीडियावर नवनीत राणा यांचे काही व्हिडिओ चांगलेच चर्चेत आले आहेत. राजकारणात येण्यापूर्वी मॉडेलिंगच्या करिअरमध्ये असलेल्या नवनीत राणा यांचे हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत . अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करणारंच अशी आग्रही भूमिका घेतल्यानंतर मुंबईत चांगलाच हंगामा झालाय. मातोश्रीवर दोन दिवसांपासूनच शेकडो शिवसैनिकांची गर्दी आहे. पण या विरोधाला न जुमानता उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा लावणारच या हट्टाला राणा दाम्पत्य पेटले. त्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. राणा दाम्पत्य हे पूर्णपणे फिल्मी असून ते याशिवाय दुसरं काय करू शकतात, असा सवालही राऊत यांनी केला होता.

काय म्हणाले होते संजय राऊत?

नवनीत राणा यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले होते, कुणाला स्टंटच करायचा असेल तर ते करू देत. ते सिनेमातील लोकं आहेत. या स्टंटने आम्हाला फरक पडत नाही. शिवसेनेचं मुंबईतलं पाणी यांना माहिती नाही. हे हनुमान चालिसा, रामनवमी हे श्रद्धेचे विषय आहेत. नौटंकी आणि स्टंटचे विषय नाहीत. अलिकडे भाजपने ही नौटंकी सुरु केलीय. भाजपाला मार्केटिंगसाठी असे सी ग्रेड स्टार लागतात. शिवसैनिकांना यामुळे काहीही फरक पडणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी शुक्रवारी केली होती.

नवनीत राणा यांचे व्हिडिओ चर्चेत

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या राजकारणात येण्यापूर्वी त्या मॉडेलिंग क्षेत्रात होत्या. अनेक हिंदी, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि पंजाबी चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या त्या एकमेव अभिनेत्री आहेत. संजय राऊत यांच्या टीकेनंतर नवनीत राणा यांचे पुढील चार व्हिडिओ चर्चेत आहेत.

व्हिडिओ 1 – तेलगू चित्रपट गुड बॉय मधील नवनीत राणा यांचा एक विनोदी सीन सध्या चर्चेत आहे. व्हिडिओत कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा संवाद दाखवला आहे आणि तेवढ्यात नवनीत राणा यांची एंट्री होते. त्यानंतर कॉलेजमधील सर्व मुलांचे ती लक्ष वेधून घेते. तिच्याशी बोलणाऱ्या मुलांना ती एकानंतर एक सडेतोड उत्तरं देते.

व्हिडिओ 2- दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये नवनीत कौर-राणा यांच्या तेलगू चित्रपटांमधील हिट गाणे बॅक टू बॅक दाखवण्यात आले आहेत.

व्हिडिओ 3- आणखी एका व्हिडिओमध्ये निर्णयम या मूळ तेलगू चित्रपटाचे हिंदी व्हर्जन असलेल्या बलवान चित्रपटातील  चाँद जैसे चमके तेरा गोरा बदन..  गाणे आहे.  आदित श्रीनिवास, नवनीत कौर, तनिकेला भरणी यांचा गाण्यात डान्स दाखवण्यात आला आहे.

व्हिडिओ- 4- शालीमार सिनेमाचा एक व्हिडिओ सध्या ट्रेंडिंग आहे. यात नवनीत राणा यांचे बेस्ट लव्ह सीन्स एकानंतर एक दाखवण्यात आले आहेत.

इतर बातम्या-

Economic crisis in Sri Lanka; श्रीलंकेला भारताचा मदतीचा हात, इंधन खरेदीसाठी 50 कोटी डॉलरचे कर्ज

भाजप मालामाल, 212 कोटींची देणगी; पण काँग्रेस-राष्ट्रवादीसह 10 पक्षांच्या पदरात फक्त 19 कोटीच

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.