Thackeray Vs Rana : झुकेगा नहीं साला, राणांना पुरुण उरणारा शिवसेनेचा आवाज ऐकलात का? मातोश्रीबाहेर आजीचा पहारा, थेट आदित्यचा फोन

मुंबई : आज राज्याच्या राजकारणात मातोश्री आणि राणा दाम्पत्य यांची जोरदार चर्चा आहे. आज सकाळपासूनच मुंबईत शिवसैनिकांनी आज सकाळी राणा दाम्पत्याच्या घरासमोर आंदोलन केलं. राणा दाम्पत्यानं घराबाहेर पडून दाखवावं, अशी धमकी दिली. त्यासाठी शेकडो शिवसैनिक राणा यांच्या घरासमोर जमले होते. पोलिसांनी त्यांना थांबविलं. तरीही राणा दाम्पत्य मातोश्रीवर (Matoshri) हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणण्यावरून ठाम होते. […]

Thackeray Vs Rana : झुकेगा नहीं साला, राणांना पुरुण उरणारा शिवसेनेचा आवाज ऐकलात का? मातोश्रीबाहेर आजीचा पहारा, थेट आदित्यचा फोन
शिवसैनिक आजीबाईImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 2:51 PM

मुंबई : आज राज्याच्या राजकारणात मातोश्री आणि राणा दाम्पत्य यांची जोरदार चर्चा आहे. आज सकाळपासूनच मुंबईत शिवसैनिकांनी आज सकाळी राणा दाम्पत्याच्या घरासमोर आंदोलन केलं. राणा दाम्पत्यानं घराबाहेर पडून दाखवावं, अशी धमकी दिली. त्यासाठी शेकडो शिवसैनिक राणा यांच्या घरासमोर जमले होते. पोलिसांनी त्यांना थांबविलं. तरीही राणा दाम्पत्य मातोश्रीवर (Matoshri) हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणण्यावरून ठाम होते. सध्या ते माघार घेणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळत आहे. यात राणा यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर शिवसैनिक जमले होते. यात एक आजीबाई आक्रमकपणे बोलातना पाहायला मिळाल्या. जणू त्या मातोश्रीची रक्षा करण्यासाठी आल्या आहेत, असं त्यांच्या वागण्यातून जाणवत होतं. या आजींची सध्या सध्या जोरदार चर्चा आहे. या आजीबाईंनी शिवसेनेच्या वतीने पुष्पा स्टाईलमध्ये राणा दाम्पत्याला प्रत्युत्तर दिलंय. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिग आहे.

मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी शिवसेना झिंदाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी तिथे एक आजीबाई उपस्थित होत्या. त्यांना आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीमध्ये बोलावून घेतलं. आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधल्यानंतर या आजींनी बाहेर येताच पुष्पा स्टाईलने विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. पुष्पाची मै झुकेगा नहीं साला हा डायलॉग म्हणत त्यांनी शिवसैनिक माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं.

यावेळी बोलताना राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन दाखवावं, असं आव्हान दिलं. येण्याची अशी हिंमत कुण्याच्यात नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर येऊन दाखवा, असं या आजी म्हणाल्या.

नवनीत राणा आज सकाळी 9 वाजता आपण मातोश्री बाहेर हनुमान चालिसा वाचणार असल्याचं शुक्रवारी म्हटलं होतं. त्यापूर्वीच त्यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे राणा दाम्पत्याच्या घरासमोर एका शिवसेनेच्या कार्यकर्त्याने अॅम्ब्युलन्स आणली आहे. त्यावर बसून काही कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत. अॅम्ब्युलन्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर मजेशीर कमेंट देखील आल्या आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.