आईसह दोन मुलं विहिरीत आढळले, जळगावातील धक्कादायक घटना

आईसह दोन लेकरांचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याची खळबळजनक घटना समोर (Mother And Two Children Bodies Found In Well) आली आहे.

आईसह दोन मुलं विहिरीत आढळले, जळगावातील धक्कादायक घटना
drowning
| Updated on: Feb 25, 2021 | 10:48 AM

जळगाव : आईसह दोन लेकरांचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याची खळबळजनक घटना समोर (Mother And Two Children Bodies Found In Well) आली आहे. ही घटना जळगावातील भडगाव तालुक्यातील कनाशी येथे घडली आहे. ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत अज्ञाप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही (Mother And Two Children Bodies Found In Well).

यामध्ये आई गायत्री दिनेश पाटील (वय 43), तिचा मुलगा खुशवंत दिनेश पाटील (वय 10) मुलगी भैरवी दिनेश पाटील (वय 8) या तिघांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कनाशी शिवारात ही घटना घडली.

गायत्री ही दोन्ही मुलांसह कनाशी शिवारात असलेल्या त्यांच्या शेतात गेल्या होत्या. सायंकाळपर्यंत त्या घरी परत आल्या नाही. त्यामुळे गावात त्यांची शोधाशोध सुरु झाली. शोध घेत असताना त्यांच्या शेतातील विहिरीत हे तिघे तरंगताना दिसून आले. त्यानंतर त्यांना तात्काळ बाहेर काढून भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

याप्रकरणी भडगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपास पोलीस करत आहेत.

Mother And Two Children Bodies Found In Well

संबंधित बातम्या :

महाविद्यालयीन तरुणाकडून मैत्रिणीची हत्या, एकतर्फी प्रेमातून संपवलं

न्यायाधीशांनी ‘फाशी’च्या शिक्षेपूर्वी रामायणातील श्लोक सुनावला, अशा व्यक्तीच्या हत्येचं पाप लागत नाही म्हणत निर्णय

जळगाव हादरलं ! दोन दिवसात तीन महिला अत्याचाराच्या घटना