जळगाव हादरलं ! दोन दिवसात तीन महिला अत्याचाराच्या घटना

रावेर येथील अत्याचाराती घटना ताजी असतानाच जळगाव जिल्ह्यात दोन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल तीन महिला अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत (three women abused case in Jalgaon in two days).

  • रवी गोरे, टीव्ही 9 मराठी, जळगाव
  • Published On - 22:28 PM, 23 Feb 2021
जळगाव हादरलं ! दोन दिवसात तीन महिला अत्याचाराच्या घटना

जळगाव : रावेर येथील अत्याचाराती घटना ताजी असतानाच जळगाव जिल्ह्यात दोन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल तीन महिला अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. भुसावळ येथे आज 35 वर्षीय महिलेवर तर मुक्ताईनगर तालुक्यात काल (22 फेब्रुवारी) एका 17 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनांमुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे (three women abused case in Jalgaon in two days).

तर तिसऱ्या घटनेत मुक्ताईनगर तालुक्यातील वायला ते चिंचखेडा मार्गावर रस्त्याच्या बाजूला तीन ते चार वर्षाच्या चिमुकलीचे पाय बांधून तिला रस्त्याच्या एका बाजूला फेकून दिल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. संबंधित बालिका कुपोषित असल्याची माहिती समोर आली आहे. या बालिकेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पोलिसांची कारवाई काय?

पोलिसांनी मुक्ताईनगर घटनेतील आरोपी चेतन रवींद्र सुतार यास अटक केली आहे. त्याचबरोबर पीडित मुलीची प्रकृती चांगली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर भुसावळ घटनेप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. विशेषता दोन्ही घटनेतील महिला आणि मुलगी मध्य प्रदेश येथील असल्याची माहिती समोर आली आहे. तर रावेरच्या घटनेतील कुटुंबही मध्य प्रदेशातील होतं (three women abused case in Jalgaon in two days).

रावेरमध्ये नेमकं काय घडलंय?

रावेर शहरात चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली होती. तीन भावंडं आणि एक अल्पवयीन मुलगी घरी एकटे असताना तीन ते चार अज्ञातांमी मुलीवर अत्याचार केला होता. त्यानंतर त्यांनी मुलीसह चारही जणांची हत्या केली होती.

हेही वाचा : प्रसूतीनंतर मृत्यू पावलेल्या महिलेची स्मशानभूमीतून राख चोरणारी टोळी गजाआड