न्यायाधीशांनी ‘फाशी’च्या शिक्षेपूर्वी रामायणातील श्लोक सुनावला, अशा व्यक्तीच्या हत्येचं पाप लागत नाही म्हणत निर्णय

न्यायाधीशांनी 'फाशी'च्या शिक्षेपूर्वी रामायणातील श्लोक सुनावला, अशा व्यक्तीच्या हत्येचं पाप लागत नाही म्हणत निर्णय
Hardoi Court Sentenced To Death

निर्णयावर ते स्वाक्षरी करतील त्यापूर्वी त्यांनी दोन्ही पक्षांचे वकील आणि आरोपीच्या उपस्थितीत रामचरित मानसचे काही ओळी सुनावल्या (Hardoi Court Sentenced To Death).

Nupur Chilkulwar

|

Feb 24, 2021 | 9:14 AM

लखनऊ : आपल्या जीवनात अनेक असे प्रसंग घडतात जे नेहमी आपल्या स्मरणात राहतात (Hardoi Court Sentenced To Death). असंच काही उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्हा न्यायालयात घडलं. येथे अपर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एका मुलीच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणावर निर्णय सुनावत होते. निर्णयावर ते स्वाक्षरी करतील त्यापूर्वी त्यांनी दोन्ही पक्षांचे वकील आणि आरोपीच्या उपस्थितीत रामचरित मानसचे काही ओळी सुनावल्या (Hardoi Court Sentenced To Death).

शिक्षा सुनावण्यासाठी अपर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश चंद्र विजय श्रीनेत यांनी सुनावलेल्या रामचरित मानसच्या ओळी

“अनुज बधू भगिनी सुत नारी, सुनु सठ कन्या सम ए चारी, इन्हहि कुदृष्टि बिलोकई जोई, ताहि बधें कछु पाप न होई.”

त्यानंतर न्यायाधीशांनी या ओळींचा अर्थही समजावून सांगितला. “लहान भावाची स्त्री किंवा पत्नी, बहीण, पुत्राची स्त्री अथवा कन्या… या चौघी सारख्या आहेत. यांना जो कोणी यांच्यावर वाईट दृष्टी टाकेल त्याचा वध केल्याने कुठलंही पाप लागत नाही”, असं सांगत न्यायाधीषांनी आरोपीला मृत्यूदंड सुनावला आणि निर्णयावर स्वाक्षरी केली. सोबतच त्यांनी स्वाक्षरी केलेला पेन तोडला.

आरोपीचा गुन्हा क्षमा करण्यासारखा नाही

ज्या आरोपीला मृत्यूदंड सुनावण्यात आला आहे त्याचं नाव गुड्डू उर्फ गब्बू आहे. गुड्डू सारख्या कुख्यात गुन्हेगाराला निर्णय देताना न्यायाधीष म्हणाले की “आरोपीने ज्या प्रकारे गुन्हा केला आहे तो क्रूर आणि अमानुषतेच्या मर्यादेपलीकडील आहे. अशा व्यक्तीवर दया दाखवण्याची आवश्यकता नाही. जे काही या गुन्हेगाराने केलं आहे ती व्यक्तीची हत्या नाही, तर मानवतेची हत्या आहे. आरोपीने एका चिमुकल्या लहान मुलीवर बलात्कार करुन तिचा जीव घेतला. जी गुन्हेगारासमोर स्वत:चा बचाव करण्याच्या परिस्थितीत नव्हती. ती असहाय्य होती. पुरावे मिटवण्यासाठी आरोपींने मुलीचा मृतदेह तलावात टाकला. हे सर्व क्रूरतेच्या कुठल्याही परिभाषेत येत नाही.”

कठोर शिक्षेस पात्र

हरदोई जिल्हा न्यायालयाचे अपर जिल्हा तथा सत्र न्यायाधीश चंद्र विजय श्रीनेतने सांगितलं “भारतीय समाजात कन्येला पूजनीय मानलं जातं. अल्पवयीन मुली विशेषत: 10 वर्षांपर्यंतच्या मुलींना देवी मानलं जातं. त्यांची पूजा-अर्चना केली जाते. त्यांचे पाय धुतले जातात. ज्या देशात कन्यांना इतक्या मोठ्या सामाजिक स्तरावर पूजनीय मानलं जातं, तिथे दीड वर्षांच्या चिमुकलीसोबत इतकं घृणास्पद काम हे निश्चितपणे कठोर शिक्षेस पात्र आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या दया दाखवण्याची कुठलीही संधी नाही.”

Hardoi Court Sentenced To Death

संबंधित बातम्या :

पश्चिम बंगाल : मेदिनीपूर जिल्ह्यात बॉम्ब हल्ल्यात TMC च्या कार्यकर्त्याचा मृत्यू, दोघे गंभीर

सदनिकांमध्ये वास्तव्याचा बहाण्यानं लुटमार करणाऱ्या दाम्पत्याला बेड्या, 19 ठिकाणच्या चोरीची कबुली!

वसईत महिलेला झाडाला बांधून मारहाण, आक्षेपार्ह व्हिडीओही बनवल्याने खळबळ

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें