सदनिकांमध्ये वास्तव्याचा बहाण्यानं लुटमार करणाऱ्या दाम्पत्याला बेड्या, 19 ठिकाणच्या चोरीची कबुली!

बारामतीसह राज्याच्या विविध भागात सदनिकांमध्ये भाडेतत्वावर राहून हे दाम्पत्य चोरी करत होतं. या दाम्पत्यानं तब्बल 19 ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

सदनिकांमध्ये वास्तव्याचा बहाण्यानं लुटमार करणाऱ्या दाम्पत्याला बेड्या, 19 ठिकाणच्या चोरीची कबुली!
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 8:09 PM

बारामती : सदनिकांमध्ये वास्तव्याचा बहाणा करुन लुटमार करणाऱ्या दाम्पत्याला पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागानं बेड्या ठोकल्या आहेत. बारामतीसह राज्याच्या विविध भागात सदनिकांमध्ये भाडेतत्वावर राहून हे दाम्पत्य चोरी करत होतं. या दाम्पत्यानं तब्बल 19 ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. बारामती एमआयडीसी परिसरात एका घरात चोरी झाली होती. त्या चोरीचा तपास करताना पोलिसांनी या दाम्पत्याला अटक केली आहे.(Pune Rural Police arrested a couple for stealing from 19 places)

चोरी करणाऱ्या दाम्पत्याला नागपुरातून अटक

बारामती एमआयडीसी परिसरातील एका घरातून सोने आणि रोख रक्कम अका एकूण 3 लाख 36 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याबद्दल बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना नवनीत मधुकर नाईक आणि प्रिया नवनीत नाईक हे दोघे या परिसरात वास्तव्यास असल्याचं समोर आलं. त्यानुसार त्यांचं सध्याचं वास्तव्य असलेल्या नागपूर इथं जाऊन गुन्हे अन्वेषण विभागानं चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

राज्यातील विविध भागात चोरी

या जोडप्यानं बारामती, पुणे, सातारा, रत्नागिरी, नाशिक, ठाणे, मुंबई, अमरावती, अहमदनगर, जालना, कोल्हापूर, बंगळुरू अशा विविध शहरात मिळून तब्बल 19 ठिकाणी चोरी केली होती. या चोरीची कबुली नाईक दाम्पत्याने दिली आहे. सदनिकेत भाडे तत्वावर राहण्याचा बहाणा करुन त्याच परिसरात हे दाम्पत्य चोरी करत होते. चोरी केल्यानंतर हे दाम्पत्य त्या परिसरातून निघून जात होतं.

या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरीमकर, रविराज कोकरे, अनिल काळे, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, ज्योती बोंबळे, मोहम्मद अझहर मोमीन, विजय कांचन, अजित भुजबळ, अभिजीत एकशिंगे, मंगेश थिगळे, धीरज जाधव, महिला पोलिस डी. बी. डमरे यांनी चोरीच्या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

गाडीच्या काचेवर टकटक करणारी ‘गँग’, मुंबईत मोबाईल, लॅपटॉपसह मौल्यवान वस्तू चोरणारे गजाआड

मुंबई, ठाण्यासह इतर ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ, मोठ्या शिताफीने पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Pune Rural Police arrested a couple for stealing from 19 places

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.