
एका धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कंपनीवर आरोप आहे की ती कंपनी कमी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिक्षा म्हणून त्यांचे नग्न फोटो प्रसारित करायची. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या गोपनीयतेच्या उल्लंघनाबरोबरच मानसिक त्रास आणि नैतिक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता ही कंपनी कोणती आहे? नेमकं काय झालं जाणून घ्या…
घटनेची पार्श्वभूमी
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जपानमध्ये घडली आहे. नियो कॉर्पोरेशन नावाची कंपनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर लक्ष्य करते आणि जे कर्मचारी अपेक्षित निकाल देत नाहीत, त्यांना अपमानित करण्यासाठी त्यांचे खासगी फोटो, विशेषतः नग्न फोटो, सहकाऱ्यांमध्ये किंवा सोशल मीडियावर शेअर करते. तसेच कर्मचाऱ्यांचा पगारही कट करते. अशा कृतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Cute Video: सदावर्तेंना चिमुकलीने दिली सर्वांसमोर धमकी, राज ठाकरेंना म्हणाली I Love You
प्रकरण काय आहे?
पॉवर सेक्टरशी संबंधित नियो कॉर्पोरेशन कंपनीवर दाखल झालेल्या खटल्यात पाच माजी कर्मचाऱ्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार, एका माजी कर्मचाऱ्याने असा दावा केला आहे की, कंपनीच्या विक्री व्यवस्थापनाने त्याला नग्न छायाचित्रे घेण्याचे निर्देश दिले होते. कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्याला सांगण्यात आले होते की, जेव्हा तो दैनंदिन विक्री लक्ष्य पूर्ण करण्यात अपयशी ठरेल, तेव्हा त्याने स्वतःचे नग्न फोटो काढावेत. याशिवाय, या फोटोंना इतर कर्मचाऱ्यांसह शेअर करण्यास त्याला भाग पाडले गेले.
व्यवस्थापनाने उडवली खिल्ली
माजी कर्मचाऱ्याने असा दावा केला आहे की, त्याचा वरिष्ठ कर्मचारी नियमितपणे शिक्षा म्हणून त्याच्या खासगी अवयवांना स्पर्श करायचा. जेव्हा त्याने याबाबत तक्रार करण्यासाठी शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधला, तेव्हा त्याची खिल्ली उडवण्यात आली. शाखा व्यवस्थापकाने कथितरित्या सांगितले की, प्रत्येकजण अशा परिस्थितीतून गेला आहे. कर्मचाऱ्याने सांगितले की, सततच्या छळामुळे तो नैराश्यात गेला. अहवालात कामाच्या ठिकाणी ओव्हरटाइम, शाब्दिक अपमान, आर्थिक शोषण आणि शारीरिक छळ यासारख्या विषारी वातावरणाची माहिती समोर आली आहे.
नुकसानभरपाईची मागणी
काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांचे सेल कमिशन मनमानेपणाने कापले गेले. काही प्रकरणांमध्ये, त्यांना त्यांच्या पगाराचा काही हिस्सा कंपनीला परत करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता पीडित कर्मचारी 19 मिलियन येन (सुमारे 1,32,000 अमेरिकी डॉलर) नुकसानभरपाईची मागणी करत आहेत. आरोपांच्या गंभीरतेवरूनही नियो कॉर्पोरेशनने या दाव्यांचे खंडन केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, हे सर्व फेक आहे.