पत्नी सोडून गेली, 3 महिन्याच्या मुलीला कसं सांभाळावं? बाळाला रस्त्यावर सोडणाऱ्या बापाला नागरिकांनी पकडलं

पत्नी सोडून गेली, तीन महिन्याच्या चिमुकलीचे पालकत्व कसे करणार या भीतीने जन्मदात्या बापच मुलीला सोडून पळ काढण्याच्या तयारीत होता.

पत्नी सोडून गेली, 3 महिन्याच्या मुलीला कसं सांभाळावं? बाळाला रस्त्यावर सोडणाऱ्या बापाला नागरिकांनी पकडलं

कल्याण : पत्नी सोडून गेली, तीन महिन्याच्या चिमुकलीचे पालकत्व कसे करणार (Crime In Kalyan) या भीतीने जन्मदात्या बापच मुलीला सोडून पळ काढण्याच्या तयारीत होता. मात्र काही नागरिकांनी खलील शेख नावाच्या या निर्दयी बापाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे (Father Trying To Left Three Month Old Girl Child On Road In Kalyan).

कल्याण पश्चिमेतील स्टेशन रोड परिसरातील स्कायवॉकच्या खाली एक व्यक्ती हातात लहान बाळ घेऊन उभी होता. काही वेळानंतर ही व्यक्ती हातातील लहान बाळाला सोडून जात असताना काही तरुणींनी पाहिले. प्रसंगावधान राखत परिसरातील नागरिकांनी त्या व्यक्तीला पकडलं आमि बाळासोबत महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नेलं.

पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला. यानंतर जी माहिती समोर आली ते ऐकूण पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कळव्यात राहणाऱ्या खलील शेख याची पत्नी काही दिवसांपूर्वी त्याला सोडून कुठे तरी निघून गेली आहे. खलीलला दोन महिने 23 दिवसांची मुलगी आहे. खलीलची पत्नी सोडून गेली आहे. तीन महिन्याच्या चिमुकलीचे पालकत्व एकट्याने कसे करणार या भीतीने तो तिला सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचा होता.

कल्याणचे एसीपी अनिल पोवार यांनी सांगितले की, तेजस केंबरे या व्यक्तीच्या तक्रारीवर गुन्हा दाखल झाला आहे. पालकत्व लपविण्यासाठी खलील हा प्रकार करीत होता. सध्या त्या मुलीला डोंबिवलीतील जननी आशिष या सामाजिक संस्थेत ठेवण्यात आले आहे. खलील शेखला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.

मात्र, खलील याने आपण आपल्या पत्नीला शोधण्यासाठी आलो असता गैरसमजूतीने हा प्रकार घडल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांच्या तपासात खरी बाब समोर येणार आहे.

Father Trying To Left Three Month Old Girl Child On Road In Kalyan

संबंधित बातम्या :

फेसबुक लाईव्हमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, आयर्लंडमधून सूचना, करंदीकरांच्या प्रयत्नांनी युवक बचावला

धक्कादायक! पैशाचे आमिष दाखवून 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, जळगावातील खळबळजनक घटना

माता न तू वैरिणी…आई आणि मुलगा नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघड

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI