Kalyan Crime : घटस्फोटीत महिलेला आधी प्रेमाची जाळ्यात ओढले, मग लैंगिक अत्याचार केला; मन भरल्यावर मित्राच्या स्वाधीन केले

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुड्डू व राहुल विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनीही गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपली टीम तैनात करत 24 तासाच्या आत दोन्ही नराधमाला बेड्या ठोकल्या.

Kalyan Crime : घटस्फोटीत महिलेला आधी प्रेमाची जाळ्यात ओढले, मग लैंगिक अत्याचार केला; मन भरल्यावर मित्राच्या स्वाधीन केले
कल्याणमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 9:20 PM

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात गेल्या अनेक दिवसांपासून विनयभंग, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दोन्ही शहरे गॅंगरेपच्या घटनांनी हादरली असताना कल्याणमध्ये विवाहितेवर बलात्कार (Rape) झाल्याची घटना समोर आलीय. या प्रकरणी 30 वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस (Kolasewadi Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक (Arrest) करण्यात आलीय. मागील वर्षीच्या नवरात्री उत्सवापासून ते आजतागायत हा प्रकार सुरू असल्याचं पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. पीडित महिला गरोदर राहिली आहे. पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिला आधार मिळाला असं वाटलं, मात्र त्यानेही तिचा फायदा घेतला आणि नंतर मित्राच्या ताब्यात दिलं. या घटनेनं कल्याण पुन्हा हादरलंय. यापैकी एक आरोपी हा कल्याणमधील एका राजकीय पक्षाच्या कार्यलयात कामाला आहे.

धमकावून महिलेवर वर्षभर सुरु होता बलात्कार

गुड्डू उर्फ सिध्देश भाटकर (30) आणि राहुल देवराव बोरडकर (28) अशी अटक केलेल्या नराधमांची नावे आहेत. पीडित महिलाचे पुण्यातील एका इसमाशी विवाह झाला होता. मात्र घरगुती भांडणावरून ती पतीला सोडून कल्याणमध्ये आली. मात्र घरी न जाता ती कल्याण रेल्वे स्टेशनला फ्लॅटफॉर्मवर थांबली. याचवेळी राजकीय पक्षाच्या कार्यलयात कामाला असलेला आरोपी गुड्डू उर्फ सिद्धेश याने पीडितेशी ओळख वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. इतकंच नाही तर लग्नाचे आमिषसुद्धा तिला दाखवण्यात आल्याने पीडित महिलेचा गुड्डूवर विश्वास बसला. त्याने तिला कल्याण पूर्वेतील स्वतःच्या घरी नेऊन तिच्यावर वारंवार बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर कुठेही या घटनेची वाच्यता केली तर ठार मारण्याची धमकीही दिली.

कोळसेवाडी पोलिसांकडून 24 तासाच्या आत दोघांना अटक

इतक्यावरच हा गुड्डू थांबला नाही. तर ही महिला गरोदर राहिल्याने लग्नाचा तगादा लावू लागली. त्यामुळे गुड्डूने त्याचा मित्र राहुल याच्यासोबत महिलेची ओळख करून दिली आणि तो बेपत्ता झाला. त्यानंतर राहुलनेही पीडितेवर त्याच्या घरात नेऊन बलात्कार केला आणि तोही बेपत्ता झाला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुड्डू व राहुल विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनीही गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपली टीम तैनात करत 24 तासाच्या आत दोन्ही नराधमाला बेड्या ठोकत गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. (Kalyan Kolsewadi police arrested two accused who abused woman)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.