AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साडी विकण्याच्या नावाखाली महिलांशी मैत्री, नंतर लाखोंचा गंडा, दोन वर्षांनंतर आरोपीला बेड्या 

यानंतर अनिताने या सर्व महिलांना पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले. (Kalyan Police Arrest Women theft)

साडी विकण्याच्या नावाखाली महिलांशी मैत्री, नंतर लाखोंचा गंडा, दोन वर्षांनंतर आरोपीला बेड्या 
| Updated on: Feb 16, 2021 | 4:53 PM
Share

कल्याण : साडी विकण्याच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या एका महिलेला तब्बल दोन वर्षानंतर आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अनिता गावंडे असे या आरोपी महिलेचे नाव आहे. या महिलेने आतापर्यंत 3 कोटी 13 लाखांचा गंडा घातला आहे. (Kalyan Police Arrest Women theft After two Years)

कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी पारिसरात सुशील अर्पाटमेंट आहे. या अर्पाटमेंटमध्ये अनिता गावंडे नावाची एक महिला राहते. अनिता सुरुवातीला तिच्या घरातून साडी विक्रीचा व्यवसाय करीत होती. त्यानंतर तिने इमारतीत साडीचे दुकान सुरु केले. साडी विकता विकता तिने अनेक महिलांशी मैत्री केली.

पैसे दुप्पट करण्याचे अमिष दाखवत गंडा 

यानंतर अनिताने या सर्व महिलांना पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले. फॉरेन एक्सचेंज मनी करन्सी यामध्ये पैसे गुंतवा, याद्वारे पैसे दुप्पट होतात, असे तिने महिलांना सांगितले. यानंतर अनेक महिलांनी अनिता गावंडेकडे पैसे दिले.

मात्र 2018 मध्ये काही गुंतवणूकदारांना त्यांची फसवणूक झाल्याचे समजले. यानंतर या महिलांनी पोलिसात धाव घेतली. यानंतर अनेक महिला आणि त्यांची कुटुंब दुसऱ्या ठिकाणी स्थायिक झाले. मात्र ठाणे आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत होती.

दोन वर्षांनतर आरोपी गजाआड

या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी अनिताला तब्बल अडीच वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांच्या पथकाने अनिताला कल्याण कोर्टात हजर केले आहे. याप्रकरणी न्यायालयाने अनिताला 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या महिलेचा पतीसुद्धा आरोपी आहे.

आमचा विश्वास संपादन करुन आमच्याकडून लाखो रुपये घेतले गेले आहे. आता अटक झाल्यानंतर पोलिसांनी ठोस कारवाई करत आमचे पैसे लवकर परत मिळतील, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया गुंतवणूकदार महिलांनी दिली. (Kalyan Police Arrest Women theft After two Years)

संबंधित बातम्या : 

पतीकडून पत्नीच्या वडील आणि भावाची हत्या; पत्नीचे अपहरण करून आरोपी पसार

एक-दोन नव्हे, चाळीस घरं फोडली, अट्टल चोरटे गजाआड, एक किलो सोनं जप्त

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.