Kalyan Crime : महागड्या गाड्या वापरण्याचा शौक, लोकांच्या बाईक्स चोरून… कल्याणचा भामट्या पोलिसांना कसा सापडला ?
कोणाला महागडे कपडे तर कोणाला मोबाईल वापारयाचा, कोणाला अँटिग गोष्टी शोधायचा छंद असतो. त्यासाठी मेहनत करून, पैसे कमावण्याचाही अनेकांचा प्रयत्न असतो. पण आपल्या आवडीाठी दुसऱ्यांना कोणी त्रास देत असेल किंवा गैरमार्गाचा वापर करत असेल तर मात्र हा शौक घातक ठरतो.

शौक काफी बडी चीज होती है. कोणाला महागडे कपडे तर कोणाला मोबाईल वापारयाचा, कोणाला अँटिग गोष्टी शोधायचा छंद असतो. त्यासाठी मेहनत करून, पैसे कमावण्याचाही अनेकांचा प्रयत्न असतो. पण आपल्या आवडीाठी दुसऱ्यांना कोणी त्रास देत असेल किंवा गैरमार्गाचा वापर करत असेल तर मात्र हाँ शौक महागात पडतो. असाचा काहीसा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे. महागड्या गाड्या, बाईक्स वापरण्याचा शौक असलेला एक तरूण सरळ त्यांची चोरी करायचा, त्या मनसोक्त वापरायचा आणि मग कुठेतरी त्या गाड्या सोडून पार व्हायचा. कल्याणच्या या ‘हुश्शार’ चोरामुळे शहरातील नागरिक आणि पोलिस फारच वैतागले होते, मात्र अखेर पोलिसांनी क्लुप्ती लढवत त्याला अटक केलीच. पियुष जाधव असे आरोपीचे नाव असून त्याला अटक केल्यावर कोळसेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत .
अल्पवयीन असल्यापासूनच गाड्यांवर मारायचा डल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी सराईत बाईक चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्याकडून चोरी केलेली महागडी दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे . पियुष जाधव असे आरोपीचे नाव असून तो कल्याण पूर्व काटेमानिवली परिसरात राहतो. त्याला महागड्या गाड्या खूप आवडतात, मात्र ती विकत घ्याची तेवढी पत नसल्याने पियुष सरल सरळ त्या गाड्या चोरायचा, नंतर ती बाईक मनसोक्त वापरायचा आणि नंतर कुठे तरी दुचाकी सोडून देत निघून जायचा.
धक्कादायक गष्ट म्हणजे आरोपी म्हणजे पियुष हा अल्पवयीन असल्यापासूनच दुचाकी चोरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. सराईत चोर असलेल्या पियुष विरोधात या आधी देखील बाईक चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याला अटक करण्यात आली असून कोळसेवाडी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत .
पत्नीचा खून करून आत्महत्या , पुणं हादरलं
कर्जबाजारी झाल्याने एका फळ विक्रेत्याने आधी पत्नीचा खून केला आणि मग स्वत:देखील आत्महत्या केली. पुण्यात हा अतिशय भयानक प्रकार उघडकीस आला आहे. कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले. मांजरी खुर्द परिसरात हाँ प्रकार घडला असून त्यामुळे आजूबाजूचे नागरिक मात्र प्रचंड हादरले आहेत. उज्वला नागनाथ वारुळे असे खून झालेल्या महिलेचे तर नागनाथ वसंत वारुळे असे आत्महत्या केलेल्या चे नाव आहे
धक्कादायक गोष्ट म्हणजे पत्नीचा खून आणि आत्महत्या करण्यापूर्वी त्या तरुणाने मोबाईल मध्ये व्हाईस रेकॉर्ड करून मी खूप कर्जबाजारी झालो आहे पैशाची चंचल सुरू असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर त्याने पत्नीचा गळा आवळून खून केला आणि गळफास घेत स्वतःचं आयुष्यही संपवलं.
