AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच तरूणीच्या प्रेमात 2 तरूण पडले, आपसांत भिडले… रस्त्यावरच राडा, थेट गोळीबारही

प्रेमात तर लोक काहीही करू शकतात, कोणत्याही थराला जाऊ शकतात. पण त्यात कोणाचा जीव पणाला लागला तर ? असाच एक किस्सा उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये घडला जिथे, दोन गटांमध्ये थेट रस्त्यावरच फायरिंग झालं. आणि त्याचं कारण होतं एक मुलगी.

एकाच तरूणीच्या प्रेमात 2 तरूण पडले, आपसांत भिडले... रस्त्यावरच राडा, थेट गोळीबारही
| Updated on: Mar 15, 2024 | 10:09 AM
Share

कानपूर | 15 मार्च 2024 : युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं असं म्हणातात. प्रेमात तर लोक काहीही करू शकतात, कोणत्याही थराला जाऊ शकतात. पण त्यात कोणाचा जीव पणाला लागला तर ? असाच एक किस्सा उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये घडला जिथे, दोन गटांमध्ये थेट रस्त्यावरच फायरिंग झालं. आणि त्याचं कारण होतं एक मुलगी.. हो, तुम्ही बरोबर वाचलंत. एकाच मुलीच्या प्रेमात पडलेल्या दोन तरूणांच्या गटामध्ये जोरदार वाद झाला आणि प्रकरण थेट गोळीबारापर्यंत गेलं. हे प्रकरण चमनगंज ठाणे क्षेत्रातील आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस तेथे पोहोचले आणि त्यांनी तीन आरोपींना अटक केली. पण मुख्य आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. या सर्व आरोपींविरोधात पोलिसांवी हत्येचा आरोप तसेच 7 सीएलए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

एकाच तरूणीच्या प्रेमात 2 तरूण 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूरच्या कर्नलगंज येथील रहिवासी असलेल्या हतीफचे ज्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते, त्याच मुलीशी चमनगंजचा येथील तरूण ताहा हादेखील बोलायचा. एकच मुलगी आपल्या दोघांशी बोलत असल्याचे , त्यांना समजल्यावर दोन्ही तरूणांचे आधी फोनवरून भांडण सुरू झाले. मात्र तिथे भांडण न मिटल्याने त्यांनी एकमेकांना चमनगंज येथील टाकिया पार्कजवळ येऊन प्रकरण मिटवण्याचे आव्हान दिले.

बुधवारी रात्री दोघेही तेथे पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत आणखी काही मुलेही होती. तेथे आधी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि काही वेळातच दोघांनी एकमेकांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी तीन राऊंड गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर दोन्ही बाजूचे लोक घटनास्थळावरून पळून गेले. डीसीपी आरएस गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या तपासासाठी एसीपी श्वेता कुमारी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे. पोलिसांना घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी तीन आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी दोन पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

Follow Us
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...