AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय आहे ‘केम छो’ भानगड? अलार्म दाबताच लागायचा लाल दिवा, बदलायचे वातावरण! मीरा रोड पोलिसांची मोठी कारवाई

मुंबईतील मीरा रोडवरील केम छो बारच्या छाप्यात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पोलिस येण्यापूर्वी बारमधील वातावरण 'संस्कारी' बनवले जायचे. पोलिसांच्या छाप्यामुळे केम छो बार चर्चेत आला असताना, या बारवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याच्या बदलीमुळे नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

काय आहे 'केम छो' भानगड? अलार्म दाबताच लागायचा लाल दिवा, बदलायचे वातावरण! मीरा रोड पोलिसांची मोठी कारवाई
Kem Cho BarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 13, 2025 | 5:30 PM
Share

मुंबईतील मीरा रोड पुन्हा एकदा चर्चेत आहे. याचे कारण आहे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेला ‘केम छो’ ऑर्केस्ट्रा बार. पोलिसांच्या छाप्यात येथे गुप्त खोल्या आणि अनैतिक गतिविधींचा खुलासा झाला आहे. पोलिस येण्यापूर्वी बारमध्ये अलार्म वाजायचा आणि लाल दिवा लागताच बारमधील वातावरण ‘संस्कारी’ बनायचे. पोलिस तपासात असे समोर आले की, मेकअप रूमच्या मागे रेकॉर्डेड संगीतावर केवळ बारमधील मुली लिप-सिंक करायच्या. इतकेच नाही, तर बारमध्ये एक गुप्त मार्ग होता, ज्यामार्फत एका खोलीत पोहोचता यायचे. पोलिसांनी दरवाजा उघडला तेव्हा तिथे 11 मुली लपलेल्या आढळल्या.

पोलिसही चकित झाले

पोलिसांच्या मते, बारमध्ये 20 ते 25 मुली उपस्थित होत्या, तर नियमानुसार ऑर्केस्ट्रा बारमध्ये फक्त 8 गायक (पुरुष/महिला) असण्याची परवानगी आहे. येथे लाइव्ह गायन होत नव्हते, तर रेकॉर्डेड संगीतावर महिला फक्त ओठ हलवून सादरीकरण करायच्या. बारमध्ये येणाऱ्या उत्साही लोकांना वाटायचे की त्या लाइव्ह गात आहेत. खुलासा झाला की, बारमध्ये अलार्म वाजवून पोलिस येण्याची सूचना दिली जायची आणि मुली एका खोलीत लपवल्या जायच्या. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाचे आयुक्त निकेत कौशिक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या छाप्यामुळे हा बार चर्चेत आला आहे. मात्र, या छापा टाकणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या बदलीमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा स्व:त अधिकारी चकित झाले की बाहेरून सामान्य दिसणाऱ्या या मालमत्तेत गुप्त खोल्या बनवल्या होत्या.

वाचा: जर इवांका माझी मुलगी नसती तर… ट्रम्प यांनी कहरच केला, मुलीबद्दल वादगस्त विधान

‘केम छो’ बारला कोणाचे आशीर्वाद?

पोलिसांच्या छाप्यानंतर समोर आले आहे की, एक वर्षापूर्वी 29 जून 2024 रोजी तत्कालीन महानगरपालिका आयुक्त संजय काटकर आणि पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी स्व:त उपस्थित राहून हा केम-छो ऑर्केस्ट्रा डान्स बार जमीनदोस्त केला होता. या बिअर बारचे मालक दिनकर हेगडे यांच्याविरुद्ध 12 सप्टेंबर 2024 रोजी काशीमीरा पोलिस ठाण्यात एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरीही, वर्षभरातच हा बिअर बार पुन्हा बेकायदेशीरपणे बांधण्यात आला. स्थानिक लोक विचारत आहेत की, या ऑर्केस्ट्रा बारला कोणाचे संरक्षण मिळाले आहे. केम छो बारमधील अनैतिक गतिविधींचा खुलासा केला होता. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. केम छो ऑर्केस्ट्रा डान्स बार मीरा-भाईंदर पोलिसांच्या काशीमीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट