आईस्क्रिममध्ये विष मिसळून आत्महत्येचा प्रयत्न, महिला बचावली, अनवधानाने मुलगा-बहिणीचा मृत्यू

| Updated on: Feb 25, 2021 | 2:31 PM

उंदीर मारण्याचे औषध मिसळलेले आईस्क्रिम टेबलवर ठेवून महिला निघून गेली, ते आईस्क्रिम तिचा पाच वर्षीय मुलगा अद्वैत आणि बहीण दृष्या यांनी खालले (Kerala mother kills son sister )

आईस्क्रिममध्ये विष मिसळून आत्महत्येचा प्रयत्न, महिला बचावली, अनवधानाने मुलगा-बहिणीचा मृत्यू
उंदीर मारण्याचे औषध आईस्क्रिममध्ये घालून महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता
Follow us on

तिरुअनंतपुरम : आईस्क्रिममध्ये विष मिसळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा जीव वाचला, मात्र अनवधानाने तेच आईस्क्रिम खाललेल्या तिच्या मुलाचा-बहिणीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्येचा प्रयत्न आणि हत्येप्रकरणी केरळ पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील कन्हानगडमध्ये ही घटना घडली. (Kerala mother accidentally kills son and sister with poison laced ice cream in an Suicide attempt)

नेमकं काय झालं

25 वर्षीय वर्षाने 11 फेब्रुवारीला आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने उंदीर मारण्याचे औषध आईस्क्रिममध्ये घालून खाल्ले. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ती स्वतःच्या खोलीत गेली. मात्र विष मिसळलेले आईस्क्रिम तिने तसेच टेबलवर ठेवले होते. ते आईस्क्रिम तिचा पाच वर्षीय मुलगा अद्वैत आणि बहीण दृष्या यांच्या नजरेस पडले. दोघांनी आईस्क्रिम संपवलं. त्यानंतर हॉटेलमधून बिर्याणी मागवून तीही खाल्ली.

मुलगा-बहिणीने अनवधानाने आईस्क्रिम खाल्लं

त्याच रात्री अद्वैतला उलट्यांचा त्रास सुरु झाला. त्याची तब्येत खालावल्यामुळे कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केलं. परंतु दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. अद्वैतच्या मृत्यूनंतर दृष्याही आजारी पडली. तिलाही तातडीने हॉस्पिटलला नेण्यात आले. परंतु आठवडाभराच्या झुंजीनंतर 24 फेब्रुवारीलाही तिचेही निधन झाले. 17 फेब्रुवारीला वर्षाच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

विषमिश्रित आईस्क्रिम खाल्ल्यानंतर फारसा त्रास न झाल्यामुळे वर्षाने आपण केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाविषयी कोणालाच सांगितलं नाही. मुलगा अद्वैत आणि बहीण दृष्याच्या आजारी पडण्याविषयीही ती बोलली नाही. त्यामुळे बिर्याणी खाल्ल्याने दोघांची तब्येत बिघडल्याचा अंदाज कुटुंबीयांनी वर्तवला होता.

उंदीर मारण्याचे औषध घातक

उंदीर मारण्याचे औषध मोठ्या माणसांच्या तुलनेत लहान मुलांसाठी अधिक जीवघेणे ठरु शकते. त्याची लक्षणं काही दिवस किंवा आठवड्यांनंतरही जाणवू शकतात. कारण त्याचा यकृत, हृदय यांच्यावर परिणाम होतो, तसंच अंतर्गत रक्तस्रावही जाणवतो. (Kerala mother accidentally kills son and sister with poison laced ice cream in an Suicide attempt)

वर्षाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

वर्षाने आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागील नेमकं कारण अद्याप पोलिसांना समजलेलं नाही. कन्हानगडमधील माहेरी ती आई आणि बहिणीसोबत राहण्यासाठी आली होती. त्यावेळी तिने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. वर्षावर कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्यवध, कलम 305 अंतर्गत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

टिकटॉक स्टार समीर गायकवाडची पुण्यात गळफास घेत आत्महत्या

डोक्यात वरवंटा घालून सासूचा खून, नंतर फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

(Kerala mother accidentally kills son and sister with poison laced ice cream in an Suicide attempt)