Ketaki Chitale : केतकी चितळे प्रकरणात आज कोर्टात नेमकं काय घडलं? केतकीने वकिलाविना काय केला युक्तिवाद?, कशी होती तिची बॉडी लँग्वेज ?

Ketaki Chitale : केतकी चितळे प्रकरणात आज कोर्टात नेमकं काय घडलं? केतकीने वकिलाविना काय केला युक्तिवाद?, कशी होती तिची बॉडी लँग्वेज ?
केतकी चितळेची पोलीस कोठडी वाढवून मागणार
Image Credit source: tv9 marathi

कोर्टात क्राईम बॅचने केतकीच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. केतकीने केलेले पोस्ट तिने का केले ? कोणाच्या सांगण्यावरून केली. या मागे कोण आहे, याचा शोध घ्यायचा आहे. तसेच केतकीचा मोबाईल जप्त केलाय लॅपटॅाप जप्त करणे बाकी आहे.

महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 15, 2022 | 2:24 PM

मुंबई – मला बोलण्याचं लिहिण्याचं स्वातंत्र्य नाही का ? मी राजकीय व्यक्ती नाही, मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का ? असा युक्तीवाद आज ठाणे कोर्टात केतकी चितळे हीने स्वत:केला. शरद पवारांच्याबाबतीत (Sharad Pawar) सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे (Ncp) कार्यकर्त्यांनी केतकी चितळेवरती (Ketki Chitale) जोरदार टीका केली आहे. केतकी चितळे हीच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं होतं. कोर्टात युक्तीवाद झाल्यानंतर केतकीला 18 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकीच्या विरोधात राज्यभरात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतकीच्या अधिक चौकशीसाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. काल झालेल्या जाहीर सभेत देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या विषयावर टिप्पणी केली. तसेच राज ठाकरेंनी एक पत्रक काढून अशी प्रवृत्ती वेळीचं ठेचली पाहिजे असं म्हटलं आहे.

चेहऱ्यावरती कसलाही भीती किंवा पश्चाताप झाल्याचं दिसतं नाही

केतकी चितळे हीने याच्या आगोदर देखील अशा पोस्ट केल्या आहेत.  केतकीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती कसलाही भीती किंवा पश्चाताप झाल्याचं दिसतं नव्हतं. तसेच केतकीने आज ठाणे कोर्टात पोस्ट केल्याचे मान्य केले आहे.  वकील नितीन भावे आणि केतकीचे काय सबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.  केतकी कळंबोलीमध्ये एकटी राहते.  तसेच तिचे आईवडिल गोरेगावला राहतात.

केतकी चितळेंनी नेमका युक्तीवाद केला

कोर्ट – तुमची काही तक्रारआहे का ?

केतकी – नाही

कोर्ट – तुमचे वकील कोणी आहेत का?

केतकी – नाही, मी जे काही बोलले तो माझा अधिकार आहे, मी जे काही पोस्ट केले तो माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे

क्राईम बॅचने केतकीच्या पोलिस कोठडीची मागणी केली

कोर्टात क्राईम बॅचने केतकीच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. केतकीने केलेले पोस्ट तिने का केले ? कोणाच्या सांगण्यावरून केली. या मागे कोण आहे, याचा शोध घ्यायचा आहे. तसेच केतकीचा मोबाईल जप्त केलाय लॅपटॅाप जप्त करणे बाकी आहे. आम्हाला केतकीची ५ दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी केली होती. केतकीने आज कोर्टात स्वतःच युक्तीवाद केला आहे. मी कोणी राजकीय व्यक्ती नाहीये. मी राजकीय लीडर नाहीये. मी एक सामान्य व्यक्ती आहे. मी जी पोस्ट केली ती एक प्रतिक्रिया होती. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे.

हे सुद्धा वाचा

बोलण्याचे लिहिण्याचे स्वातंत्र्य नाहीये का ? मी काही मास लिडर नाहीये की माझ्या काही लिहिण्याने कायदा सुव्यवस्था निर्माण होईल. मी केलेले पोस्ट खुशीने आणि मर्जीने केलीये असा युक्तीवाद केला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें