कोल्हापूर : दैनंदिन आर्थिक व्यवहारात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या नोटांबाबत धक्कादायक (Kolhapur crime news) माहिती समोर आलीय. 100, 200 आणि 500 च्या खोटा नोटा (Fake notes) खपवणारी एक टोळी सक्रिय होती. या टोळीच्या पोलिसांनी (Kolhapur Police) मुसक्या आवळल्या आहे. कोल्हापुरातून ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी एकूण तिघा जणांना अटक करण्यात आलीय. हे तिघेही जण मजूर असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आलंय. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल दीड लाख रुपयांपेक्षाही अधिकच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात. तसंच बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारं साहित्यदेखील पोलिसांनी जप्त केलंय. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटकातही खोट्या नोटा खपवण्याच आल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या अनुशंगाने पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय.