AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोळसेवाडी पोलिस ठाणे राडा प्रकरण; गणपती गायकवाड यांच्यासह पाच जण निर्दोष

कोळसे वाडी पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याच्या साल २०१४ च्या प्रकरणात कल्याण कोर्टाने माजी आमदार गणपती गायकवाड आणि शिवसेनेचा पदाधिकारी निलेश शिंदे यांच्यासह अन्य तिघा जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

कोळसेवाडी पोलिस ठाणे राडा प्रकरण; गणपती गायकवाड यांच्यासह  पाच जण निर्दोष
| Updated on: Sep 16, 2025 | 3:50 PM
Share

साल २०१४ मध्ये कल्याण येथील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात राडा केल्याच्या प्रकरणात माजी आमदार गणपती गायकवाड आणि शिवसेनेचा पदाधिकारी निलेश शिंदे यांच्यासह अन्य तिघा जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र सध्या गणपत पाटील आणि कुणाल पाटील उल्हासनगरात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये माजी आमदार महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी कारागृहात आहेत.

कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याच्या प्रकरणात माजी आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना पदाधिकारी निलेश शिंदेसह अन्य तिघा जणांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.2014 मध्ये कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये राडा केल्याचा गुन्हा पोलिसांनी त्यांच्यावर दाखल केला होता. या प्रकरणात माजी आमदार गणपत गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख निलेश शिंदेसह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात कल्याण न्यायालय सुरू सुनावणी सुरु होती.

विशेष म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी स्वतः हा गुन्हा नोंदवून या आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र पुराव्यांअभावी कल्याण न्यायालयाने गणपत गायकवाड सह इतर चार ही आरोपींची आज निर्दोष मुक्तता केली. सध्या गणपत गायकवाड आणि कुणाल पाटील हे उल्हासनगरमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्ये माजी आमदार महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणात कारागृहात आहेत. मात्र 2014च्या या गुन्ह्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाविरोधात आंदोलन केल्याचा राग मनात धरून खोटा गुन्हा दाखल केल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद झाल्याने कल्याण न्यायालयाने या पाच आरोपींचा निर्दोष मुक्तता केली आहे.

महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरण

उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये माजी आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण अध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. महेश गायकवाड आणि इतर दोघे वरिष्ठ पोलिस निरीक्षक (पीआय) अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये बसले होते.त्यावेळी गणपत गायकवाड आणि त्याचे सहकारी केबिनमध्ये घुसले आणि महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. महेश गायकवाड यांच्या शरीरात सात गोळ्या घुसल्या होत्या. या प्रकरणात पोलिसांनी गणपत गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात हत्या करण्याचा प्रयत्न आणि इतर कलमाखाली गुन्हा दाखल करीत खटला दाखल केला आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...