लातूरमध्ये चाललंय काय? हत्येच्या गुन्ह्याखालील आरोपीचा पोलिसांवरच हल्ला, पोलीस व आरोपी दोघेही जखमी

लातूरमधील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारानंतर आरोपी जखमी झाला आहे. लातूरच्या शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या गोळीबार प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूरमध्ये चाललंय काय? हत्येच्या गुन्ह्याखालील आरोपीचा पोलिसांवरच हल्ला, पोलीस व आरोपी दोघेही जखमी
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 3:58 PM

लातूरः लातूरमधील गुन्हेगारीचं  (Crime rate) प्रमाण वाढल्याचा दाखला देणारी घटना आज घडली. हत्येच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या एका आरोपीनं पोलिसांवरच हल्ला चढवला. लातूर शहरातील एमआयडीसी पोलिसांच्या (MIDC police) हद्दीत ही घटना घडली. सदर आरोपीला सापळा रचून पकडण्याचा पोलिसांचा प्लॅन होता. त्यानुसार, सर्व यंत्रणा सज्ज असताना या आरोपीनं (Accused) पोलिसांवरच हल्ला चढवला. आरोपी असा एकाएकी हल्ला करेल, अशी कल्पना नव्हती. मात्र पोलिसांनीही वेळीच आपला बचाव केला. या चकमकीत आरोपीदेखील जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतला प्रकार

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकूर पोलिसांच्या हद्दीत हा प्रकार घडला. या घटनेत नारायण इरबतनवाड या आरोपीनं पोलिसांवर हल्ला केला. एका हत्येच्या प्रकरणात नारायण हा गेल्या कित्येक दिवसांपासून फरार होता. तो लातूरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर चाकूर पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीनं उलट पोलिसांवरच हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यानं पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांनाही मारहाण केली. यावेळी स्वतःच्या बचावासाठी बालाजी मोहिते यांनी स्वतःकडे असलेल्या रिव्हॉल्वरमधून आरोपीवर गोळी झाडली. यात आरोपीला कमरेखाली गोळी लागल्याने तो जखमी झाला.

आरोपी जखमी, उपचार सुरु

लातूरमधील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारानंतर आरोपी जखमी झाला आहे. लातूरच्या शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या गोळीबार प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच

दरम्यान, लातूर शहरासह जिल्हाभरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून, दररोज दोन ते तीन ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. लातूर शहर, अहमदपूर, उदगीर, आणि निलंगा शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा पोलीस स्टेशनला तक्रार देऊनही आरोपींचा तपास लागत नसल्याचे समोर येत आहे. पोलीस प्रशासनाने दुचाकी चोरी रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी वाहनधारकांसह नागरिकांकडून होत आहे.

Non Stop LIVE Update
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.