AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिव्ह अँड रिलेशनशिप : जोडप्यामध्ये झाला या कारणावरुन वाद,प्रियकराने मग जे केले..

आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्यापूर्वीच क्राईम ब्रँच पथकाने त्याला अटक केली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांनी सांगितले.

लिव्ह अँड रिलेशनशिप : जोडप्यामध्ये झाला या कारणावरुन वाद,प्रियकराने मग जे केले..
| Updated on: Apr 30, 2025 | 8:27 PM
Share

22 एप्रिल रोजी टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इमारतीमधील घरात तरुणीचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. काल या तरुणीच्या नातेवाईकांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात हत्या झाल्याचा संशय व्यक्त करीत तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची दखल घेत कल्याण क्राईम ब्रँचने हल्लेखोर असलेल्या तिचा प्रियकर सुभाष भोईर याला कल्याण दुर्गाडी पुल येथून ताब्यात घेतले. या प्रकरणात प्रियकराने

सुभाष भोईर हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असून कोरोना काळात रुग्णालयात काम करणाऱ्या नर्ससोबत प्रेम प्रकरण झाल्याने या तरुणीसोबत गेल्या तीन वर्षांपासून तो ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहत होता. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. याच वादातून सुभाष भोईर याने या तरुणीचा गळा आवळून तिची हत्या करीत तेथून पळ काढला होता. अखेर काल गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्याण क्राईम ब्रँचने अवघ्या २० तासात सुभाष भोईर याला बेडा ठोकल्या आहेत .

ठाकुर्ली येथे राहणाऱ्या सुभाष भोईर याचे मयत तरुणीशी प्रेम संबंध होते. यातूनच दोघांनी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या तीन वर्षापासून हे दोघे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होत होते. 22 तारखेला या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला त्यामुळे संतापलेल्या सुभाष भोईर याने या तरुणीचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने घरातून पळ काढला.

बंद घरात तिचा मृतदेह आढळल्यानंतर याप्रकरणाची पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीसांनी याप्रकरणी एडीआर दाखल करत पुढील तपास सुरू केला. मात्र आठवडाभराने तरुणीच्या कुटुंबियांनी या तरुणीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत या प्रकरणाचा तपास सुरू केला .

आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता

कल्याण क्राईम ब्रँच देखील या प्रकरणी समांतर तपास करत होती. या तरुणीचा प्रियकर सुभाष भोईर याच्यावर कल्याण क्राईम ब्रँचला संशय होता. मात्र सुभाष भोईर पसार झाला होता अखेर तांत्रिक तपास आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सुभाष भोईर हा कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी ब्रिजजवळ आल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रँचने दुर्गाडी किल्ला परिसरात सापळा रचत सुभाष भोईर याला बेड्या ठोकल्या. सुभाष भोईर हा पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्यापूर्वीच कल्याण क्राईम ब्रँच पथकाने त्याला अटक केली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांनी सांगितले.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...