पत्नीचे दोन प्रियकर आणि पतीची प्रेयसी समोरासमोर आल्याने राडा; हाणामारीत प्रियकराचा मृत्यू

बसंती रैगर असे जखमी महिलेचे नाव असून ती पती कन्हैया रैगर आणि मुलांसोबत भागात राहते. सोमवारी रात्री उशिरा बसंतीचे दोन्ही प्रियकर मुकेश शर्मा व मोहनया धाकड आणि पती कन्हैयाची प्रेयसी कमली बावरिया मंडी परिसरात आले. हे सर्व जण दारुच्या नशेत होते.

पत्नीचे दोन प्रियकर आणि पतीची प्रेयसी समोरासमोर आल्याने राडा; हाणामारीत प्रियकराचा मृत्यू
अकोला जिल्हातल्या अकोटमध्ये भरदिवसा सशस्त्र दरोडा

जयपूर : प्रेमप्रकरणातून झालेल्या भांडणातून एक महिला जखमी आणि एक पुरुष जखमी झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी जयपूरमधील मुहानामध्ये घडली आहे. पत्नीचे दोन प्रियकर आणि पतीची प्रेयसी समोरासमोर आल्याने हा राडा झाला. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर पत्नीच्या प्रियकराचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले असून पुढील तपास करीत आहेत. (Lover’s death in a fight between two lovers of wife and lover of husband)

दारुच्या नशेत झालेल्या भांडणातून एकाचा मृत्यू

बसंती रैगर असे जखमी महिलेचे नाव असून ती पती कन्हैया रैगर आणि मुलांसोबत भागात राहते. सोमवारी रात्री उशिरा बसंतीचे दोन्ही प्रियकर मुकेश शर्मा व मोहनया धाकड आणि पती कन्हैयाची प्रेयसी कमली बावरिया मंडी परिसरात आले. हे सर्व जण दारुच्या नशेत होते. त्यानंतर यांच्यात वादावादी सुरु झाले. या वादाचे पर्यावसन भांडणात झाले. या भांडणात बसंती गंभीर जखमी झाली, तर तिचा एक प्रियकर मोहनया धाकड याचा मृत्यू झाला.

कन्हैया रैगर आणि कमली बावरियाला पोलिसांनी घेतले ताब्यात

मंगळवारी सकाळी मंडी परिसरात एक महिला आणि एक पुरुष जखमी अवस्थेत पडले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी मोहनया धाकड याला मृत घोषित केले. तर गंभीर जखमी असलेल्या बसंतीवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे पोलीस अधिकारी लखन सिंह यांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी तपास केला असता दारुच्या नशेत असलेला पतीचा बसंतीचा पती कन्हैया आणि त्याची प्रेयसी कमलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांकडे बसंतीची दोन वर्षाची मुलगी आढळली असून पोलिसांनी तिला चाईल्ड हेल्पलाईनकडे सोपवले आहे. तर बसंतीचा दुसरा प्रियकर मुकेश शर्मा पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Lover’s death in a fight between two lovers of wife and lover of husband)

इतर बातम्या

राग आल्याने बेभान, पतीने पत्नीसमोरच चिरला स्वत:चा गळा, कारण ऐकून औरंगाबाद हादरलं

पतीच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या महिलेचा फोटो पाहून संताप, कुऱ्हाडीने वार करुन पत्नीकडून हत्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI