AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राग आल्याने बेभान, पतीने पत्नीसमोरच चिरला स्वत:चा गळा, कारण ऐकून औरंगाबाद हादरलं

पतीने बसस्थानकावर आपली पत्नी समोर उभी असताना स्वत:चा गळा धारदार शस्त्राने चिरून घेतला. ही घटना सोमवारी (30 ऑगस्ट) मध्यरात्री घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

राग आल्याने बेभान, पतीने पत्नीसमोरच चिरला स्वत:चा गळा, कारण ऐकून औरंगाबाद हादरलं
HUSBAND WIFE CLASH
| Edited By: | Updated on: Aug 31, 2021 | 3:54 PM
Share

औरंगाबाद : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर एका पतीने आपल्या पत्नीसमोरच धक्कादायक कृत्य केलं आहे. पतीने बसस्थानकावर आपली पत्नी समोर उभी असताना स्वत:चा गळा धारदार शस्त्राने चिरून घेतला. ही घटना सोमवारी (30 ऑगस्ट) मध्यरात्री घडली. या घटनेनंतर  एकच खळबळ उडाली असनू जखमी पतीला औरंगाबादच्या शासकीय रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार जखमी पतीचे नाव भाऊसाहेब काकडे तर पत्नीचे राणी काकडे असे आहे. काकडे यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. (husband cut out his own throat due to clash with his wife husband hospitalized in aurangabad government hospital)

छोट्या-छोट्या कारणांवरुन दोघांत सारखे वाद

प्राप्त माहितीनुसार 33 वर्षीय भाऊसाहेब काकडे यांचा काही दिवासांपूर्वी 22 वर्षीय राणी यांच्याशी विवाह झाला होता. सुरुवातीचे सहा महिने त्यांच्या संसार सुखात चालला. नंतर मात्र, छोट्या-छोट्या कारणांवरुन त्यांच्यात सारखे वाद होत होते. नेहमीच वाद होत असल्यामुळे भाऊसाहेब काकडे मानसिक तणावातून जात होते. शेवटी वादाला कंटाळून भाऊसाहेब आणि राणी या दाम्पत्याने घटस्फोट घेण्याचे ठरवले.

घटस्फोटानंतरही दोघांत खडाजंगी

नियोजित वेळेनुसार सोमवारी दोघांनीही घटनस्फोट घेतला. मात्र, रितसर घटस्फोट झाल्यानंतरही यांच्यातील वाद कमी झाला नाही. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावरच या दोघांमध्ये वाद सुरु झाला. शेवटी मध्यरात्री बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच भाऊसाहेब यांनी एका धारदार शस्त्राने स्वत:चा गळा चिरून घेतला.

पतीची प्रकृती गंभीर, उपचार सुरु

या घटनेत काकडे गंभीर जखमी झाले आहेत. भररात्री घटना घडल्यामुळे बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली होती. काकडे यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सोमवारपासून उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे औरंगाबादेत एकच खळबळ उडाली आहे. सततच्या भांडणामुळे पतीने स्वत:च आपला गळा कापून घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

इतर बातम्या :

पतीच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या महिलेचा फोटो पाहून संताप, कुऱ्हाडीने वार करुन पत्नीकडून हत्या

लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये प्रेयसी गर्भवती, प्रियकराने पेट्रोल टाकून पेटवले

कधी नेता, कधी न्यायाधीश, कधी मोठा अधिकारी सांगून फसवणूक; कोण आहे सुकेश चंद्रशेखर?

(husband cut out his own throat due to clash with his wife husband hospitalized in aurangabad government hospital)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.