Ludhiana Court Blast : मुंबईसुद्धा टार्गेटवर? लुधियाना ब्लास्टचा मास्टरमाईंड जर्मनीतून अटक, अनेक नवे खुलासे

लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्यात आलीय. जर्मनीत पोलिसांनी प्रतिबंध असलेल्या सिख फॉर जस्टिस (SFJ) संघटनेशी संबधित जसविंदर सिंह मुल्तानीला (Jaswinder Singh Multani) अटक केलीय.

Ludhiana Court Blast : मुंबईसुद्धा टार्गेटवर? लुधियाना ब्लास्टचा मास्टरमाईंड जर्मनीतून अटक, अनेक नवे खुलासे
Jaswinder singh Multani
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 9:57 AM

Ludhiana Court Blast : नवी दिल्ली : लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्यात आलीय. जर्मनीत पोलिसांनी प्रतिबंध असलेल्या सिख फॉर जस्टिस (SFJ) संघटनेशी संबधित जसविंदर सिंह मुल्तानीला (Jaswinder Singh Multani) अटक केलीय. जसविंदर सिंह हा लुधियाना कोर्टात झालेल्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड असल्याचं सांगितलं जात आहे. इतकचं नाहीतर जसविंदर सिंह हा दिल्ली आणि मुंबईमध्ये देखील दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत होता. त्यासंदर्भात तो कट रच असल्याची माहिती आहे. या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.

जसविंदर सिंह मुल्तानी कोण आहे?

जसविंदर सिंह मुल्तानी हा 45 वर्षांचा असून तो एसएफजेचे संस्थापक गुरपतवंत सिंह पन्नू यांचा निकटवर्तीय मानला जातो. जसविंदर सिंह याच्यावर फुटीरतावादी घटनांमध्ये सहभागी असल्याचा देखील आरोप आहे.

बलवीर सिंह राजेवाल यांच्या हत्येचा कट रचण्यात सहभागी

जसविंदर सिंह मुल्तानी यानेच सिंघू बॉर्डरवर शेतकरी नेते बलवीर सिंह राजेवाल यांच्या हत्येचा कट रचला होता. त्यानं जीवन सिंह नावाच्या व्यक्तीला त्यासाठी भडकवलं होतं. जीवन सिंहला बलवीर सिहं राजेवाल यांची हत्या करण्यासाठी मध्य प्रदेशातून हत्यार देण्यात आलं आहेत. मात्र, दिल्ली पोलिसांनी हा कट प्रत्यक्षात येण्यापूर्वीचं जीवन सिंह याला अटक केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी जसविदंर सिंह मुल्तानी यांचं त्यावेळेस पहिल्यांदा एखाद्या प्रकरणात नाव आलं होतं. तर, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं यानंतर ही माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना कळवली होती. शेतकरी नेते बलवीर सिंह राजेवाल यांना सुरक्षा घेण्यास सांगण्यात आलं होतं.

लुधियाना कोर्टातील दुसऱ्या मजल्यावरील टॉयलेटमध्ये 23 डिसेंबरला स्फोट झाला होता. त्या स्फोटात आयईडीचा वापर करण्यात आला होता. आयईडीचा वापर झाल्यानं पोलिसांना दहशतवादी हल्ल्याचा संशय होता. त्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला होता. टॉयलेटमध्ये बॉम्ब असेंम्बल करताना त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता.

इतर बातम्या:

महाडमध्ये महिला सरपंचाची हत्या, जंगलात विवस्त्र मृतदेह, बलात्काराच्या प्रयत्नाचा संशय

भविष्यातील कटकट टाळण्यासाठी हा बदल हवाच, वाहन नावावर करण्याची झंझट छुमंतर, या पद्धतीने करा मोटर वाहन मालकी हस्तांतरण  

Ludhiana Court Blast Germany police arrested terrorist Jaswinder singh Multani connection with SFJ

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.