प्रसिद्ध मॉडल खुशबूचा लव्ह जिहादमुळे मृत्यू का? कोण आहे कासिम अहमद?
"आम्ही खुशबूला पाहिल्यानंतर तिच्या शरीरावर आम्हाला मारहाणीच्या जखमा दिसल्या. यावरुन खुशबूचा मृत्यू स्वाभाविक नसल्याचा आम्हाला संशय आला. तिची हत्या झाली आहे. आमच्या मुलीसोबत लव्ह जिहाद झालाय"

मॉडल खुशबू अहीरवरचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. कुटुंबीय खुशबूला प्रेमाने खुशी म्हणून बोलवायचे. मुलीच्या मृत्यूने आई-वडिलांना धक्का बसलाय. खुशबूच्या मृत्यूने आता अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आईने खुशबूचा प्रियकर कासिम अहमदवर हत्येचा गंभीर आरोप केला आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील ही घटना आहे. खुशबूच्या आईने सांगितलं की, रात्री 11 वाजता कासिम अहमदने त्यांना फोन केला. खुशबूच शरीर आकडून गेलय असं सांगितलं. तो खुशबूला भोपाळच्या चिरायू हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेला. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर खुशबूला मृत घोषित केलं. “आम्ही खुशबूला पाहिल्यानंतर तिच्या शरीरावर आम्हाला मारहाणीच्या जखमा दिसल्या. यावरुन खुशबूचा मृत्यू स्वाभाविक नसल्याचा आम्हाला संशय आला. तिची हत्या झाली आहे. आमच्या मुलीसोबत लव्ह जिहाद झालाय“ असा कुटुंबियांचा आरोप आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मेडीकल तपासणीसाठी पाठवला आहे. अधिकाऱ्यांनुसार पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच खुशबूचा मृत्यू कसा झाला ते स्पष्ट होईल. आरोपी कासीम अहमद आधीपासून गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभागी आहे. बेकायद दारुच्या व्यवहारात आधीच तो तुरुंगात जाऊन आलाय. कासिम खुशबूच्या मोबाइलवरुन ऑनलाइन व्यवहार करायचा. त्यांच्यात पैशांवरुन काही वाद होते. चौकशी दरम्यान पोलिसांना संशयास्पद व्यवहाराचे काही पुरावे मिळाले आहेत. त्याचा तपास सुरु आहे.
चिरायू हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला
पोलिसांनुसार घटनेच्यावेळी, खुशबू आणि कासिम उज्जैनवरुन भोपाळला परतत होते. बैरागड भागात खुशबूची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर कासिम तिला चिरायू हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी कासिम अहमदला तिथूनच अटक केली. सध्या त्याची चौकशी सुरु आहे. पोलीस प्रत्येक अंगाने तपास करत आहे.
पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई
DSP दिव्या झारियाने सांगितलं की, पोलीस प्रत्येक अंगाने तपास करत आहेत. आम्ही आरोपीला अटक केली आहे. फॉरेन्सिक टीमला आवश्यक साक्षी गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई निश्चित होईल.
