कुटुंबातील पाचही सदस्यांचा तीन दिवसात अंत, या सेल्फीतील एकही जण आता नाही जिवंत

संजीव जोशी, त्यांची पत्नी अर्चना, आई नंदिनी, दोन मुली पूर्वी आणि ग्रीष्मा यांनी विष घेऊन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. कोल्ड ड्रिंकमधून विष घेण्यापूर्वी त्यांनी फॅमिली सेल्फी काढला होता. दुर्दैवाने आता या सेल्फीमधील एकही सदस्य जिवंत नाही.

कुटुंबातील पाचही सदस्यांचा तीन दिवसात अंत, या सेल्फीतील एकही जण आता नाही जिवंत
भोपाळमधील कुटुंबाची सामूहिक आत्महत्या

Bhopal mass suicide : कर्जबाजारी मेकॅनिकने आपल्या दोन मुली, पत्नी आणि आईसह विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना चार दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या सामूहिक आत्महत्येच्या प्रयत्नात मेकॅनिकची एक मुलगी आणि त्याची आई या आजी-नातीचा त्याच वेळी मृत्यू झाला होता. आता एकामागून एक मेकॅनिक, त्याची पत्नी आणि दुसरी मुलगी यांचीही प्राणज्योत मालवली. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कुटुंबाने त्यांच्या पाळीव कुत्रा आणि उंदरालाही विषही पाजले होते.

काय आहे प्रकरण?

संजीव जोशी, त्यांची पत्नी अर्चना, आई नंदिनी, दोन मुली पूर्वी आणि ग्रीष्मा यांनी विष घेऊन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. कोल्ड ड्रिंकमधून विष घेण्यापूर्वी त्यांनी फॅमिली सेल्फी काढला होता. दुर्दैवाने आता या सेल्फीमधील एकही सदस्य जिवंत नाही.

राहते घर गहाण, देणेकऱ्यांचा तगादा

मृत्यूपूर्वी जोशी कुटुंबाने भिंत आणि कागदावर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात आपल्याला नाईलाजाने हे पाऊल उचललावे लागत असल्याचा उल्लेख केला होता. तसेच आपल्या डोक्यावर कर्जाचा बोजा असल्याचंही म्हटलं होतं. बबली दुबे, तिची मुलगी राणी दुबे, पिंकी, राजू राय, लक्ष्मी राय, ओम, उर्मिला आणि आरती यांची नावं त्यांनी लिहिली होती. या सर्वांना त्यांनी आत्महत्येसाठी जबाबदार धरलं आहे.

छळ केल्याचा सुसाईड नोटमध्ये आरोप

बबलीने आपला खूप छळ केल्याचं पत्नी अर्चना जोशी यांनी म्हटलं आहे. बबलीने आमच्या घराजवळ गोंधळ घातला. यावेळी उर्मिलाही सोबत होती. पैसे देण्यासाठी आमचा घर विक्रीचा करारही झाला होता. पण बबलीचा यावर विश्वास नव्हता. त्यांनी फोनवर मुली पूर्वी आणि ग्रीष्मा यांना उचलून घेऊन जाण्याची धमकी दिली होती, असं अर्चना यांनी लिहिलं होतं.

दिल्लीतील बुरारी कुटुंबातील (Burari Suicide) 11 जणांनी 2019 मध्ये अशाच प्रकारे सामूहिक आत्महत्या केली होती. भोपाळमध्ये जोशी कुटुंबाकडून या घटनेची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या :

खुर्चीला हात-पाय बांधून नातवानेच गळा चिरला, नागपुरातील महिला डॉक्टरच्या हत्येचं गूढ उकललं

19 वर्षीय तरुणी रस्त्यात मृतावस्थेत, शेजारी रक्तरंजित चाकू आणि विषाची बाटली, प्रियकर ताब्यात

गरोदर असल्याचं सांगून लग्नाचा तगादा, पण प्रेयसीला गर्भाशयच नव्हतं, प्रियकराने काटा काढला

Published On - 1:43 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI