MP Rape : पोर होत नाही, म्हणून मिर्ची बाबाकडे गेली, बाबाने दिलं भस्म, बेशुद्ध अवस्थेत महिलेवर मिर्ची बाबाचा बलात्कार!

Madhya Pradesh crime News : महिलेनं दिलेल्या तक्रारीमध्ये या मिर्ची बाबाच्या गैरकृत्याला विरोध केला होता, असं म्हटलंय. तेव्हा वैराग्यनंद गिरी उर्फ मिर्ची बाबाने या महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली.

MP Rape : पोर होत नाही, म्हणून मिर्ची बाबाकडे गेली, बाबाने दिलं भस्म, बेशुद्ध अवस्थेत महिलेवर मिर्ची बाबाचा बलात्कार!
मिर्ची बाबावर बलात्काराचा आरोपImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 12:58 PM

मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये (Madhya Pradesh Crime News) एका बाबाला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेस सरकारच्या काळात या बाबाला राज्यमंत्री पदाचीही जबाबदारी देण्यात आलेली होती. याच बाबाला आता बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानं सगळ्यांनाच धक्का बसलाय. भोपाळमधील (Bhopal Rape News) एका महिलेनं मध्यप्रदेशातील मिर्ची बाबा याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली होती. पीडितेनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे अखेर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत मिर्ची बाबावर (Mirchi Baba) अटकेची कारवाई केलीय. मूल होत नाही म्हणून ही महिला आपली अडचण घेऊन वैराग्यानंद गिरी यांना भेटली होती. वैराग्यनंद उर्फ मिर्ची बाब यांनी या महिलेला आपल्या जवळ बोलवलं होतं आणि प्रसाद म्हणून दिलेल्या एका भस्मातून महिलेला बेशुद्ध केलं, असा आरोप करण्यात आलाय. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या या महिलेवर नंतर बाबाने संतापजनक कृत्य केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आलीय. मिर्ची बाबावर कलम 376, 506 आणि 342 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

वैराग्यनंद गिरी उर्फ मिची बाबावर बलात्काराचा आरोप

महिलेनं दिलेल्या तक्रारीमध्ये या मिर्ची बाबाच्या गैरकृत्याला विरोध केला होता, असं म्हटलंय. तेव्हा वैराग्यनंद गिरी उर्फ मिर्ची बाबाने या महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने वैराग्यनंद यांच्या भीतीने आणि समाजात बदनामी होईल या दबावाखाली पोलिसात तक्रार दाखल केलेली नव्हती. सोमवारी पीडित महिलेनं अखेर हिंमत करुन पोलीस स्थानक गाठलं आणि घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एफआयआर दाखल केला. त्यानंतर पोलिसांचं पथकं मिर्ची बाबावर कारवाई करण्यासाठी ग्लालिअरला रवाना झाली होती.

ग्वालिअरमधून अटक

ग्वालिअर पोलिसांच्या मदतीने मध्य प्रदेश पोलिसांनी अखेर मिर्ची बाबावर अटकेची कारवाई केली. याबाबत आधी ग्वालिअर पोलिसांना मध्य प्रदेशच्या भोपाळ पोलिसांनी कल्पनाही दिली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या महिला पथकाकडून आणि क्राईम ब्रांच यांच्या संयुक्त कारवाईदरम्यान, मिर्ची बाबाला ताब्यात घेण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

अनेक महिलांवर बलात्कार?

आता मिर्ची बाबाला कोर्टात हजर केलं जाईल. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली जाणार असून अशाप्रकारे इतरही महिलांसोबत मिर्ची बाबाने गैरकृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्या अनुशंगाने आता नेमकी काय माहिती चौकशीतून समोर येते, हे पाहणं महत्त्वाचंय. भारतात याआधीहीह भोंदू बाबांच्या आमीषाला बळी पडून महिलांसोबत गैरप्रकार घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा तसाच प्रकार उघडकीस आल्यानं चिंता व्यक्त केली जातेय.

Non Stop LIVE Update
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.