Triple Murder | आजी, मुलगा आणि नातवाचा निर्घृण खून, उधारीच्या वादातून तिहेरी हत्याकांड

12 एप्रिल रोजी उज्जैनमधील गुरावदा पोलीस स्टेशन अंतर्गत इंगोरिया गावात चंबळ नदीच्या काठावर दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळले होते. दोघांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या.

Triple Murder | आजी, मुलगा आणि नातवाचा निर्घृण खून, उधारीच्या वादातून तिहेरी हत्याकांड
बाथरुमध्ये हिटरचा शॉक लागून मुलाचा मृत्यूImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 1:25 PM

भोपाळ : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये (MP Ujjain) तिहेरी हत्याकांड उघडकीस आले आहे. उधारीची रक्कम चुकवावी लागू नये, यासाठी माय-लेक आणि नातवाची हत्या (Triple Murder) करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आहे. या घटनेत वापरलेले वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. उज्जैनच्या एसपींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. कर्जापोटी (Loan) घेतलेले सुमारे साडेचार लाख रुपये द्यायचे नसल्याने आरोपींनी हा खून केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

12 एप्रिल रोजी उज्जैनमधील गुरावदा पोलीस स्टेशन अंतर्गत इंगोरिया गावात चंबळ नदीच्या काठावर दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळले होते. दोघांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. त्यांची ओळख पटवण्यासाठी पोलिस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा हा मृतदेह बापलेकाचा असल्याचं समोर आलं.

घरात आजीचा मृतदेह

दुसरीकडे, मयत बापलेकाच्या कुटुंबातील 80 वर्षीय आजीही मृतावस्थेत आढळून आली. घरातील बेड बॉक्समध्ये वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक सत्येंद्र कुमार शुक्ला यांनी तपासासाठी एसआयटी स्थापन केली. पथकांनी घटनास्थळाची पाहणी करुन पुरावे गोळा केले.

उधारीच्या वादातून हत्या

उज्जैनचे एसपी सत्येंद्र कुमार शुक्ला यांनी सांगितले की, तपासात समोर आले आहे की, मृत राजेश आणि पार्थ हे छोटे व्यापारी आणि फेरीवाल्यांना व्याजावर पैसे देण्याचे काम करायचे. पोलिसांनी मयतांना ओळखणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांची चौकशी केली, त्यात आरोपींनी मयत राजेशकडून पैसे उधार घेतल्याचे समोर आले. त्याबदल्यात कोरे धनादेश देण्यात आले होते.

कर्जाची रक्कम फेडण्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता, त्यातूनच हे हत्याकांड घडले. सध्या दोन्ही आरोपींना अटक करून पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. आरोपींना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

Murder | सोयरिकीतील मध्यस्थाकडून वधूपित्याचा खून, बुलडाण्यातील हत्येचं गूढ उकललं

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.