पतीची शारीरिक संंबंधांसाठी बळजबरी, पत्नीने प्रायव्हेट पार्टच कापला

पतीची शारीरिक संंबंधांसाठी बळजबरी, पत्नीने प्रायव्हेट पार्टच कापला
'मोक्ष' प्राप्तीचा येडा नाद, लेकरं बाळं, बायको जीवानीशी बाद, एकाच घरात 5 मृतदेह

विनोद राजपूतने (नाव बदलले आहे) आपल्या पत्नीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. यामुळे नाराज झालेल्या पत्नीने त्याच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने त्याचे प्रायव्हेट पार्ट कापले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 14, 2021 | 3:18 PM

भोपाळ : जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्याचे प्रयत्न केल्यामुळे पत्नीने पतीचे प्रायव्हेट पार्ट्स कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 24 वर्षीय पत्नीने धारदार शस्त्राने 26 वर्षीय पतीचे लैंगिक अवयव कापल्याचा आरोप आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) टिकमगढमध्ये (Tikamgarh) ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण

पोलीस अधिकारी त्रिवेंद्र त्रिवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद राजपूतने (नाव बदलले आहे) आपल्या पत्नीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. यामुळे नाराज झालेल्या पत्नीने त्याच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने त्याचे प्रायव्हेट पार्ट कापले.

आठवड्याभरानंतर तक्रार

टीकमगढ जिल्हा मुख्यालयापासून 40 किलोमीटर दूर जतारा पोलीस ठाण्याअंतर्गत रामनगरमध्ये ही घटना घडली. खरं तर ही घटना 7 डिसेंबरच्या रात्री घडली, मात्र पीडित विनोदने 13 डिसेंबरला पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. विनोदने एका खासगी डॉक्टरकडून उपचार करुन घेतले. त्यामुळे सध्या त्याची प्रकृती ठीक आहे.

लग्नानंतर पती-पत्नीत वाद

2019 मध्ये लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच क्षुल्लक कारणांवरुन पती-पत्नीमध्ये वाद सुरु झाले होते. त्यानंतर दोघं वेगवेगळे राहत होते. मात्र काही दिवसांपासून त्यांनी पुन्हा एकत्र राहायला सुरुवात केली. विनोदच्या तक्रारीनंतर पत्नीच्या विरोधात कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

Nagpur Crime | सात दरोडेखोर तलवारीसह घरात घुसले, गळ्याला चाकू लावला नि सोनं लुटलं!

Nashik| मित्राला मिठी मारली म्हणून नाशिकमध्ये जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी

किरकिरणाऱ्या 27 दिवसांच्या बाळाचा त्रास, जन्मदात्रीने भिंतीवर डोकं आपटून संपवलं

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें