किरकिरणाऱ्या 27 दिवसांच्या बाळाचा त्रास, जन्मदात्रीने भिंतीवर डोकं आपटून संपवलं

किरकिरणाऱ्या 27 दिवसांच्या बाळाचा त्रास, जन्मदात्रीने भिंतीवर डोकं आपटून संपवलं
प्रातिनिधिक छायाचित्र

10 डिसेंबरला बाळाचे पोस्टमार्टम करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी बाळाच्या डोक्यावर जखम असल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी बाळाच्या आई-वडिलांकडे चौकशी केली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 14, 2021 | 11:57 AM

तिरुअनंतपुरम : 27 दिवसांच्या बाळाच्या रडण्याचा त्रास होत असल्याने जन्मदात्रीने टोकाचं पाऊल उचललं. आईने भिंतीवर डोकं आपटून अर्भकाचा जीव (Baby Murder) घेतला. आरोपी माऊलीला पोलिसांनी अटक केली आहे. केरळात ही हृदयाला घरं पाडणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बाळाचा प्रिमॅच्युअर जन्म झाला होता. आजारी असल्यामुळे बाळ सारखं रडायचं. त्याला वैतागून 21 वर्षीय आईने त्याची हत्या केल्याचा आरोप आहे.

प्रकृती खालावून बाळाचा मृत्यू

नऊ डिसेंबरला ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. त्याच दिवशी दुपारी 11 वाजता रुग्णालयात नेण्यात आलं होतं. डॉक्टरांना दाखवल्यानंतर बाळाला परत घरी सोडण्यात आलं. मात्र बाळाचा प्रकृती त्यानंतर ढासळत गेली. अखेर त्याला तालुक्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्याचा मृत्यू झाला.

बाळाच्या आईचं प्रियकरासोबत वास्तव्य

एक आश्रम चालवणारे फादर जोजी थॉमस यांच्या जबाबावरुन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. संबंधित 21 वर्षीय तरुणी या आश्रमात स्वयंपाकाचे काम करत होती. तिच्या 45 वर्षीय प्रियकरासोबत ती राहत होती.

बाळाच्या डोक्यावर जखम

10 डिसेंबरला बाळाचे पोस्टमार्टम करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी बाळाच्या डोक्यावर जखम असल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी बाळाच्या आई-वडिलांकडे चौकशी केली.

महिलेला अटक

बाळाची आई आणि तिचा प्रियकर यांच्यात फोनवर संभाषण झालं होतं. त्यानंतर त्यांनी आश्रमात एकत्र राहायला सुरुवात केली.
तरुणीचा प्रियकर आधीपासून विवाहित होता. याविषयी तिला माहिती होती, असं पोलीस चौकशीत समोर आलं. महिलेने स्वतःच बाळाची हत्या केल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.

संबंधित बातम्या :

बारमध्ये काम करणाऱ्या युवतीची आत्महत्या, चौथ्या मजल्यावरुन उडी, बार मालकावर गंभीर आरोप

बायकोच्या डोक्याचे तीन तुकडे, टॅटू मिटवण्यासाठी हात सोलला, माथेरान हत्याकांडाचा थरारक घटनाक्रम

गायक युवतीनं केली सामूहिक बलात्काराची तक्रार, तपासानंतर पोलीसही चक्रावले

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें