Nagpur| गायक युवतीनं केली सामूहिक बलात्काराची तक्रार, तपासानंतर पोलीसही चक्रावले

Nagpur| गायक युवतीनं केली सामूहिक बलात्काराची तक्रार, तपासानंतर पोलीसही चक्रावले
sitabardi

सारी पोलीस यंत्रणा कामाला लागली. 250 सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. एक हजार पोलिसांचा फौजफाटा कामाला लागला. पण, शेवटी तीनं खोटी तक्रार दिल्याचं निष्पन्न झालं. तीनं सांगितलेलं कारण सांगून पोलीसही चक्रावलेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 14, 2021 | 9:10 AM

नागपूर : गायक असलेल्या 19 वर्षीय युवतीनं सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार केली. दोघांनी कारमधून माझं अपहरण केलं. त्यानंतर कळमना भागात बलात्कार करून सोडून दिल्याचं तीनं तक्रारीत म्हटलं. त्यानंतर सारी पोलीस यंत्रणा कामाला लागली. 250 सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. एक हजार पोलिसांचा फौजफाटा कामाला लागला. पण, शेवटी तीनं खोटी तक्रार दिल्याचं निष्पन्न झालं. तीनं सांगितलेलं कारण सांगून पोलीसही चक्रावलेत.

19 वर्षीय युवती कळमेश्‍वर तालुक्यातील आहे. ती गायिका असून, धरमपेठमध्ये संगीत क्लाससाठी येते. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता ती नागपुरात आली. सीताबर्डीत उतरली आणि मुंजे चौकापर्यंत फोनवर बोलत गेली. तेथून ती दगडी पार्कजवळ पोहोचले. तेथे एका कारने दोघे आले. बुटीबोरीला कुठला रस्ता जातो असं विचारत जवळ बोलावले. दुसऱ्यानं कारमध्ये कोंबून अपहरण केले. कारमध्ये मारहाण करून तोंडाला रुमाल बांधले. चिखलीजवळच्या निर्जन परिसरात नेऊन जिवे मारण्याची धमकी देत दोघांनीही बलात्कार केला, असं तीनं कळमना पोलिसांना सांगितलं.

दोन अज्ञात आरोपींविरोधात अपहरणाचा गुन्हा

कळमन्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठांना घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त अश्‍वती दोरजे, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त विनिता साहू, मनीष कलवानीया हे सर्व अधिकारी सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. तरुणीची कसून चौकशी करून वैद्यकीय चाचणीसाठी पाठविले. वैद्यकीय अहवालावरही डॉक्टरांनी शंका उपस्थित केली. कळमना ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांचा फौजफाटा लागला कामाला

मुनलाईट स्टुयिओपासून सीताबर्डी, झाँशी राणी चौक, दगडी पार्क, रामदासपेठेतील 70 खासगी आणि 180 स्मार्ट सिटीचे फुटेज तपासण्यात आले. सकाळी साडेनऊ ते सव्वादहापर्यंत ही तरुणी सीताबर्डी परिसरात ठिकठिकाणी फिरल्याचं दिसलं. आनंद टॉकीज जवळून ती ऑटो पकडून मेयो चौकात गेली. तिथून दुसऱ्या ऑटोनं कळमन्यात पोहचली. दुपारी 12 वाजता तीनं तक्रार केली. ज्या दगडी पार्कजवळून अपहरण केल्याचं सांगितलं तिथं ती तेव्हा पोहचलीच नव्हती. हे सारं सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालं.

तरुणीवर होणार कारवाई

तरुणी ही एका यू-ट्यूब चॅनलसाठी गायन करते. तिचे युवकाशी प्रेमसंबंध होते. परंतु, दोघांच्या प्रेमसंबंधास कुटुंबीयांचा विरोध होता. बलात्कार झाल्याचा बनाव रचल्यास दया निर्माण होऊन दोघांच्या लग्नास होकार मिळू शकतो, असा फाजील आत्मविश्‍वास असल्यानं तीनं बलात्काराचं नाट्य रचल्याच सांगितलं जातं. बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यात येणार असून आता तरुणीवरच कारवाई होणार आहे. हा सारा बनाव केल्याचं तीनं शेवटी पोलिसांना सांगितलं.

 

MLC Election | नागपूर, अकोल्यात मतमोजणीला सुरुवात; नागपुरात बावनकुळे गड राखणार?

केंद्राचा पुन्हा महाराष्ट्रासोबत दुजाभाव? केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे कार्यालय नागपुरहून थेट दिल्लीला हलवले

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें