AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राचा पुन्हा महाराष्ट्रासोबत दुजाभाव? केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे कार्यालय नागपुरहून थेट दिल्लीला हलवले

नागपूरमधील केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे मुख्यालय दिल्लीला नेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आता यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला असून, जोरदार टीका केली आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून राज्यातील महत्त्वाच्या संस्था या जाणीवपूर्वक दुसऱ्या राज्यात हलवण्यात येत असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

केंद्राचा पुन्हा महाराष्ट्रासोबत दुजाभाव? केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे कार्यालय नागपुरहून थेट दिल्लीला हलवले
| Edited By: | Updated on: Dec 14, 2021 | 8:40 AM
Share

मुंबई :  नागपूरमधील केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे मुख्यालय दिल्लीला नेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आता यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला असून, जोरदार टीका केली आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून राज्यातील महत्त्वाच्या संस्था या जाणीवपूर्वक दुसऱ्या राज्यात हलवण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यापूर्वी बीकेसीमधील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता त्यानंतर नागपूरमधील केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे मुख्यालय दिल्लीला हलवले असे  काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत राज्याबाहेर हलवण्यात आलेल्या संस्था

केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली. विविध सामाजिक, आर्थिक समस्यांवर जागरुकता निर्माण करून संघटीत आणि अंसघटीत कामगारांच्या सक्षमीकरणासाठी संस्था काम करते. ही राज्यात असलेली एक महत्त्वाची संस्था होती. मात्र आता ती दिल्लीला हलवण्यात येणार आहे. याच संस्थेप्रमाणे मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेटंट डिझाईन आणि ट्रेडमार्कचे ऑफीस दिल्लीला हलवले, नॅशनल मरीन आकादमी पालघरहून गुजरातमधील द्वारकाला हलवण्यात आली. तसेच मुंबईमधील हिऱ्यांचा व्यवसाय देखील हळूहळू गुजरातला शिफ्ट होताना दिसत आहे.

‘राज्यातील भाजप नेते मूग गिळून गप्प’

दरम्यान केंद्र सरकारने नागपूरमधील केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे मुख्यालय दिल्लीला नेण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेस नेते संचिन सावंत यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प, संस्था या इतर राज्यात हलवण्यात आल्या. केंद्रातल्या भाजप सरकारकडून मुंबईचे आर्थिक महत्त्व कमी करण्याचे नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरी देखील राज्यातील भाजपा मुग गिळून गप्प असल्याची टीका सावंत यांनी केली.

संबंधित बातमी 

राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून 15 लाखापेक्षा अधिक प्रकरणे निकाली, 1 हजार 477 कोटीचा विक्रमी महसूल जमा

राहुल गांधींच्या मुंबईतील सभेला राज्य सरकारनं परवानगी नाकारली! काँग्रेसची उच्च न्यायालयात धाव

Water supply : मुंबई, ठाण्याच्या काही भागात दोन दिवस पाणीपुरवठा बंद, वाचा सविस्तर

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?