हातात नारळ देऊन आईला म्हणाला ‘ओम नमः शिवाय’ म्हण, माऊलीने डोळे मिटताच पोटच्या पोराने विहिरीत ढकललं

घरातून दुष्ट आत्मा काढण्यासाठी विधी करण्याच्या बहाण्याने पुष्कर आपल्या आईला विहिरीवर घेऊन गेला. त्याने आईला डोळे बंद करून ओम नमः शिवायचा जप करण्यास सांगितले. त्याने आईच्या हातात नारळही दिला आणि तो तिला विहिरीत फेकण्यास सांगितले.

हातात नारळ देऊन आईला म्हणाला 'ओम नमः शिवाय' म्हण, माऊलीने डोळे मिटताच पोटच्या पोराने विहिरीत ढकललं
मध्य प्रदेशात आईच्या हत्येचा प्रयत्न

भोपाळ : लग्नासाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे मुलाने आपल्या दिव्यांग आईला विहिरीत ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईला डोळे बंद करुन ओम नमः शिवायचा जप करण्यास सांगून मुलाने आईला ढकलल्याचा आरोप आहे. मध्य प्रदेशातील रतलाममध्ये ही घटना घडली

22 वर्षीय मुलावर गुन्हा

वृद्ध महिलेची शेजाऱ्यांनी सुटका केली. जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील शैलाना शहरात 30 सप्टेंबर रोजी घडली. मात्र आज (सोमवारी) ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी 22 वर्षीय आरोपी मुलगा पुष्कर ग्वाला याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

विधी करण्याच्या बहाण्याने विहिरीजवळ नेलं

घरातून दुष्ट आत्मा काढण्यासाठी विधी करण्याच्या बहाण्याने पुष्कर आपल्या आईला विहिरीवर घेऊन गेला. त्याने आईला डोळे बंद करून ओम नमः शिवायचा जप करण्यास सांगितले. त्याने आईच्या हातात नारळही दिला आणि तो तिला विहिरीत फेकण्यास सांगितले. ती नारळ विहिरीत फेकत असताना मुलाने तिला विहिरीत ढकलले आणि तो पळून गेला. या महिलेने कसा तरी पाण्याच्या पंपाचा पाईप पकडला आणि मदतीसाठी आरडाओरड कोली.

लग्नासाठी पैसे न दिल्याच्या रागातून कृत्य

कलाबाई ग्वाला या पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, पुष्कर तिच्याकडे लग्नासाठी 5 हजार रुपयांची मागणी करत होता, परंतु तिने त्याला पैसे देण्यास नकार दिला. पोलिसांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बारावीतील विद्यार्थिनीची बलात्कार करुन हत्या

दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात इयत्ता बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार करुन हत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला. मयत विद्यार्थिनीचा मित्र सुरज याने आधी मंगल पांडे नगर येथील जलसा अतिथीगृहात तिच्यासोबत दुष्कृत्य केले. त्यानंतर तिला विष पाजून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरजला अटक केली आहे. रविवारी संध्याकाळी काही तरुणांनी तेजगढी चौकाचौकात मेणबत्ती मोर्चा काढून आरोपी प्रियकराला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

मेरठचे एसपी विनीत भटनागर यांनी सांगितले की, दोन दिवसांत हे हत्याकांड उघडकीस आले आहे. त्याने सांगितले की, विद्यार्थिनीला चुकीच्या हेतूने हॉटेलमध्ये नेण्यात आले आणि नंतर कोल्ड ड्रिंकमध्ये सल्फासच्या गोळ्या मिसळून देण्यात आल्या. एसपींच्या म्हणण्यानुसार, आरोपी विद्यार्थी हा पीडिता आणि तिच्या कुटुंबाचा परिचित असल्याचे समोर आले.

संबंधित बातम्या :

नवी मुंबईतील वृद्धाच्या हत्येचा उलगडा, दुकानदाराच्या पत्नीकडे विकृत मागणी, नवरा संतापला अन्…

खोलीत कोब्रा सोडून 25 वर्षीय पत्नीची हत्या, पती दोषी सिद्ध, शिक्षेकडे लक्ष

एकत्र जीव देऊया, प्रेयसीला भुलवलं, विषारी गोळ्यांनी तरुणीचा मृत्यू, प्रियकर नामानिराळा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI