एकविरेच्या दर्शनाहून परतताना भीषण अपघात, तिघा भाविकांचा मृत्यू, चिमुकल्यांसह 9 जण गंभीर

इको कार आणि कंटेनरची जोरदार धडक होऊन पालघर जिल्ह्यातील मनोरजवळ भीषण अपघात झाला. रविवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे.

एकविरेच्या दर्शनाहून परतताना भीषण अपघात, तिघा भाविकांचा मृत्यू, चिमुकल्यांसह 9 जण गंभीर
एकवीरा देवीच्या दर्शनाहून परतताना अपघात
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 8:47 AM

मेहबुब जमादार, टीव्ही 9 मराठी : एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोरजवळ इको कारला भीषण अपघात झाला. या अपघातात तिघा भाविकांना प्राण गमवावे लागले. तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

इको कार आणि कंटेनरची जोरदार धडक होऊन पालघर जिल्ह्यातील मनोरजवळ भीषण अपघात झाला. रविवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. आवंढाणी गावाच्या हद्दी सती माता हॉटेलच्या समोर गुजरात मार्गिकेवर भरधाव इको कारने कंटेनरला धडक दिली. दर्शन घेऊन घरी परत येत असताना हा भीषण अपघात झाला.

अपघातात तिघांचा मृत्यू

या अपघातात चालकासह तिघा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. हेमंत तरे (वय 60 वर्ष) , राकेश तामोरे (वय 42 वर्ष) आणि सुषमा आरेकर (वय 32 वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची नावं आहेत. सर्व भाविक पालघरमधील दांडी येथील रहिवासी आहेत.

अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

‘बिग बॉस मराठी 2’ विजेता शिव ठाकरे भीषण कार अपघातातून बालंबाल बचावला

आधी मुलांना पाणी पाजले, मग एक एक करुन विहिरीत फेकले, नंतर आईचीही उडी घेत आत्महत्या

पंढरपूरला देवदर्शन, मग बायकोच्या माहेरी, नंतर वडिलांची भेट, अखेर पती-पत्नीचा गळफास