आधी मुलांना पाणी पाजले, मग एक एक करुन विहिरीत फेकले, नंतर आईचीही उडी घेत आत्महत्या

या वेदनादायक घटनेचा फोटो-व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शोध घेत बिक्रम पोलीस ठाणे गाठले. यानंतर महिलेची ओळख पटली आहे.

आधी मुलांना पाणी पाजले, मग एक एक करुन विहिरीत फेकले, नंतर आईचीही उडी घेत आत्महत्या
आत्महत्या प्रातिनिधिक छायाचित्र

पटना : आपल्या दोन मुलांना विहिरीत फेकून आईनेही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना पटनातील बिक्रम परिसरात रविवारी दुपारी घडली आहे. यात मायलेकांचा तिघांचाही मृत्यू झाला आहे. स्थानिक लोकांनी याची माहिती बिक्रम पोलीस ठाण्यात दिली. पोलीस ठाण्याचे प्रभारी पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर महिला आणि दोन्ही मुलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले.

प्रथम धाकट्याला, नंतर मोठ्या मुलाला फेकले

गावातील लोकांनी सांगितले की, रविवारी दुपारी एक 27 वर्षीय महिला आसपूर धर्मकांतेजवळील विहिरीजवळ पोहोचली. तिच्यासोबत सुमारे दीड ते तीन वर्षांची मुले होती. स्वत:च्या हाताने मुलांना नळाचे पाणी पाजल्यानंतर तिने आधी लहान मुलाला विहिरीत फेकले, नंतर 3 वर्षाच्या मोठ्या मुलाला विहिरीत ढकलले आणि नंतर स्वतःही उडी घेतली.

व्हिडिओ-फोटो व्हायरल होताच नातेवाईक आले

या वेदनादायक घटनेचा फोटो-व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शोध घेत बिक्रम पोलीस ठाणे गाठले. यानंतर महिलेची ओळख पटली आहे. तिचे नाव निशा कुमारी(27) असून मोठ्या मुलाचे नाव अंकित(3) तर धाकटा मुलाचे नाव आयुष(दीड वर्ष) आहे. निशाचे सासर नौबतपूरमधील रामपूर येथे आहे तर माहेर दुल्हन बाजारजवळील राणी तालाब येथे आहे.

सासरच्या घरापासून 13 किमी अंतरावर केली आत्महत्या

ज्या ठिकाणी निशाने बिक्रममध्ये विहिरीत उडी मारली ते ठिकाण तिच्या सासरच्या घरापासून 13 किलोमीटर अंतरावर आहे. निशाच्या पतीचे नाव नीरज कुमार आहे. तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना कोणतेही कारण सांगितले नसून, पतीसोबत काही कारणावरून भांडण झाल्याचे सांगितले.

बिक्रम पोलीस ठाण्याचे प्रभारी धर्मेंद्र कुमार यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, आसपूर गावाजवळील विहिरीत महिलेने आपल्या दोन मुलांसह उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे. मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आहे. (Mother commits suicide by throwing two children in a well in Patna)

इतर बातम्या

नाशिकमध्ये जामिनावर सुटलेल्या आरोपीची निर्घृण हत्या

मुंब्य्रात दोन दिवसात 16 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त, दोन आरोपी अटकेत

Published On - 12:37 am, Mon, 22 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI