डुलकी लागल्याने ट्रक चालकाची धडक, अपघातानंतर जखमी तरुणाला मारहाण करुन पलायन

उसर येथून एचपी गॅस घेऊन ट्रक चालक हा पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अलिबागकडे येत होता. चालकाला डुलकी लागल्याने अलिबागकडून रोहाकडे जाणाऱ्या बर्फाच्या ट्रकला गॅसच्या ट्रक चालकाने चुकीच्या दिशेने येऊन धडक दिली

डुलकी लागल्याने ट्रक चालकाची धडक, अपघातानंतर जखमी तरुणाला मारहाण करुन पलायन
अलिबागमध्ये ट्रक अपघात

रायगड : अलिबाग रोहा रस्त्यावर शहराला लागून असलेल्या आरसीएफ कॉलनी येथे पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात बर्फ घेऊन जाणारा ट्रक चालक जखमी झाला असून त्याच्यावर अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अलिबाग पोलिसांकडून अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. अपघातामुळे दोन्ही बाजूला एक किलोमीटर पर्यत वाहनाच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली.

कसा झाला अपघात?

उसर येथून एचपी गॅस घेऊन ट्रक चालक हा पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अलिबागकडे येत होता. चालकाला डुलकी लागल्याने अलिबागकडून रोहाकडे जाणाऱ्या बर्फाच्या ट्रकला गॅसच्या ट्रक चालकाने चुकीच्या दिशेने येऊन धडक दिली. या अपघातात बर्फ घेऊन जाणारा ट्रक चालक हा जखमी झाला आहे.

चालकाची जखमी तरुणाला मारहाण

अशा परिस्थितीत अपघात करणाऱ्या चालकाने जखमी चालकाला मारहाण करून पलायन केले आहे. जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केले आहे. वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. याबाबत चालकाविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आयशर टेम्पोला पेट

दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर एका आयशर टेम्पो अचानक पेट घेतला. या घटनेत एका व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाला. एक्सप्रेस-वेवरील रसायनी पोलीस स्टेशन हद्दीत मुंबईहून पुण्याकडे जाणारा आयशर टेम्पो काही कारणांमुळे बंद पडला होता. त्या टेम्पोला पेट्रोलिंग टीमने एका बाजूला करुन बॅरिकेट्स लावले होते. त्यानंतर काही वेळाने या टेम्पोने अचानक पेट घेतला. त्या आगीमध्ये टेम्पोच्या केबीनमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृतदेहाला टेम्पोतून काढून खालापूर तालुक्यातील चौक ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या या आगीमध्ये आयशर टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला आहे. खोपोली अग्निशमन दल, सिडको अग्निशमन दल, रिलायन्स अग्निशमन दलाने आगीवर नियत्रंण मिळवले. पण, या काळात मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक रोखून धरण्यात आल्याने दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

संबंधित बातम्या :

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर टेम्पोने पेट घेतला, एकाचा मृत्यू

पार्किंगमध्ये उभ्या बाईक्स पेटल्या, मुंबईत 20 ते 25 दुचाकी जळून खाक

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI