नाशिक : अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठचे अण्णा साहेब मोरे यांच्या अडचणीत वाढ; आर्थिक शोषणाच्या चौकशी मागणी

जिल्हाधिकारी आणि धर्मदाय आयुक्त यासंदर्भात कोणती भूमिका घेतात याकडे जिल्ह्यातील लोकांसह भाविकांचे लक्ष लागून राहीलेले आहे.

नाशिक : अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठचे अण्णा साहेब मोरे यांच्या अडचणीत वाढ; आर्थिक शोषणाच्या चौकशी मागणी
दिंडोरी येथील प्रसिद्ध स्वामी समर्थ केंद्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 8:19 PM

नाशिकः जिल्ह्यातील दिंडोरी येथील प्रसिद्ध स्वामी समर्थ केंद्राचे (Swami Samarth Center) प्रमुख श्रीराम खंडेराव उर्फ गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे (Annasaheb More)यांच्यावर तब्बल 50 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वामी समर्थ केंद्राचे धुळे येथील सेवेकरी अमर पाटील यांनी हे आरोप केले आहेत. तर अमर पाटील यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या घटनेमुळे दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रात खळबळ माजली आहे. अण्णासाहेब मोरे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सचिन पाटील यांनी केली आहे. यादरम्यान आता अण्णासाहेब मोरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून त्यांनी केलेल्या आर्थिक शोषणाच्या चौकशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) केली आहे.

भोंदूगिरीचे प्रकार भक्तांच्या मनात

त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ ही एक प्रसिद्ध धर्मादाय संस्था आहे. देशभरातील भाविकांची संस्थेवर श्रद्धा आहे. श्रीराम खंडेराव ऊर्फ अण्णासाहेब हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. अण्णासाहेब यांनी इतर सदस्यांशी संगनमत साधून 50 कोटी 68 लाख 69 हजार 221 रुपयांचा अपहार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचदरम्यान आता अध्यात्माच्या नावाखाली जादूटोणा, करणी, चमत्कार आणि भोंदूगिरीचे प्रकार भक्तांच्या मनात बिंबवत असल्याचा आरोप अनिसकडून करण्यात आला असून तसा दावा ही करण्यात आला आहे.

त्याचबरोबर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठात धार्मिक श्रद्धा, अज्ञानाच्या नावाखाली भाविकांचे आर्थिक शोषण होत असल्याचा अनिस ला संशय आहे. त्यामुळे या केंद्रावर कठोरात कठोर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे अनिसकडून करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

जिल्हाधिकारी आणि धर्मदाय आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष

त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ ही एक प्रसिद्ध धर्मादाय संस्था आहे. ज्यात अण्णासाहेब यांनी इतर सदस्यांशी संगनमत साधून 50 कोटी 68 लाख 69 हजार 221 रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार आहे. तर अध्यात्माच्या नावाखाली जादूटोणा, करणी, चमत्कार आणि भोंदूगिरीचे प्रकार भक्तांच्या मनात बिंबवत असल्याचा आरोप अनिसकडून करण्यात आला असून तसा दावा ही करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि धर्मदाय आयुक्त यासंदर्भात कोणती भूमिका घेतात याकडे जिल्ह्यातील लोकांसह भाविकांचे लक्ष लागून राहीलेले आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.