Hingoli Murder | पतीची हत्या करुन मृतदेह शेतात जाळला, हिंगोलीत पत्नीसह दोन मुलं जेरबंद

पुरावा नष्ट करण्यासाठी पत्नी आणि दोन मुलांनी खून केल्यानंतर मृतदेह शेतात नेऊन जाळून टाकला. अवधूत मुधोळ असं मयत व्यक्तीचं नाव आहे. हिंगोलीतील कळमनुरीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला

Hingoli Murder | पतीची हत्या करुन मृतदेह शेतात जाळला, हिंगोलीत पत्नीसह दोन मुलं जेरबंद
हिंगोलीत कुटुंबातील सदस्यांकडूनच हत्या
| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 8:02 AM

हिंगोली : पत्नीने मुलांच्या साथीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर वडिलांचा मृतदेह मुलांनी शेतात नेऊन जाळून टाकला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात हा नात्यांची लक्तरं मांडणारा प्रकार घडला आहे. हत्येनंतर पळून जाण्याच्या तयारीत असताना तिन्ही आरोपींना पोलिसांनी काही तासांच्या आतच जेरबंद केलं.

काय आहे प्रकरण?

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथे पत्नी आणि मुलांनी पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. पुरावा नष्ट करण्यासाठी पत्नी आणि दोन मुलांनी खून केल्यानंतर मृतदेह शेतात नेऊन जाळून टाकला. अवधूत मुधोळ असं मयत व्यक्तीचं नाव आहे.

शेतीच्या कारणावरुन घरगुती वाद

अवधूत मुधोळ आणि त्यांची दोन मुले-पत्नी यांच्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून शेतीच्या कारणावरुन घरगुती वाद सुरु होता. हा वाद इतका विकोपाला गेला, की पत्नी आणि मुलांनी पतीचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात जाळून टाकला.

शेतात मृतदेह जाळला

सकाळी शेतात जाताना ही बाब गावातील काही नागरिकांना लक्षात आली. त्यानंतर या घटनेची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर खुनाचा उडगला झाला. तिन्ही आरोपी पळून जाण्याचा तयारीत असताना पोलिसांनी त्यांना काही तासांच्या आत ताब्यात घेतले.

संबंधित बातम्या :

बुलढाण्यात खाकीला कलंक, पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी, दोघा पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune crime| चेष्टा बेतली जीवावर ; मित्रानेच केली दुसऱ्या मित्राची हत्या

अपहरण नव्हे हा तर खून, मुलगी नको म्हणून आईनेच काटा काढला, लेकीची पाण्यात बुडवून हत्या