बुलढाण्यात खाकीला कलंक, पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी, दोघा पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल

श्रीकृष्ण संदुके आणि दाते मेजर अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे असून ते जामोद पोलीस चौकीत पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत. महिलेच्या मुलीने आरडाओरडा केल्याने पोलिसांनी घरातून पळ काढला. मात्र त्यानंतर महिलेच्या मोबाईलवर अनेक वेळा फोन करुन पुन्हा शारीरिक सुखाची मागणी करीत होते.

बुलढाण्यात खाकीला कलंक, पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी, दोघा पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल
राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यामध्ये महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात उघडकीस आली आहे. दोन पोलिसांकडून एका महिलेसोबत जबरदस्तीने अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन दोघा पोलिसांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपी फरार झाले आहेत.

रात्रीच्या सुमारास घराचे दार तोडून आत घुसले नराधम

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जामोद गावात पीडित महिला आपल्या पती आणि मुलीसह राहते. महिलेचा पती 25 नोव्हेंबर रोजी कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. महिलेचा पती घरी नसल्याची संधी साधत हे दोन्ही पोलीस रात्रीच्या सुमारास महिलेच्या घराचे बंद तोडून घरात घुसले. त्यांनी महिलेशी अश्लील संभाषण करुन शरीर सुखाची मागणी केली. यावेळी महिला आणि पोलिसात सुरु असलेले संभाषण ऐकून शेजारच्या खोलीत झोपलेली महिलेची मुलगी जागी झाली. मुलीने मदतीसाठी जोरजोरात आरडाओरडा सुरु केला. मुलीचा आरडाओरडा पाहून या पोलिसांनी तिथून पळ काढला.

आरोपी फरार असून पोलीस शोध घेताहेत

श्रीकृष्ण संदुके आणि दाते मेजर अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे असून ते जामोद पोलीस चौकीत पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत. महिलेच्या मुलीने आरडाओरडा केल्याने पोलिसांनी घरातून पळ काढला. मात्र त्यानंतर महिलेच्या मोबाईलवर अनेक वेळा फोन करुन पुन्हा शारीरिक सुखाची मागणी करीत होते. अखेर महिलेने या सर्वाला कंटाळून पोलीस स्टेशन गाठले आणि या नराधमांविरुद्ध तक्रार नोंदवली. तक्रारीच्या पडताळणीनंतर या दोघांविरुद्ध कलम 354, 354 अ, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोघेही नराधम सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (A case has been registered against two policemen for demanding physical relation from a woman)

इतर बातम्या

Pune crime| चेष्टा बेतली जीवावर ; मित्रानेच केली दुसऱ्या मित्राची हत्या

शेवटी शोध संपला ! अपहरण नव्हे हा तर खून, मुलगी नको म्हणून आईनेच काटा काढला, लेकीची पाण्यात बुडवून हत्या

Published On - 7:10 pm, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI