61 वर्षीय नराधमाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेची प्रसुती, कोल्हापुरात खळबळ

पीडित मुलीच्या इच्छेविरुद्ध आरोपीने आपल्या नवीन बांधकामावरील पत्र्याच्या शेडमध्ये वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. ती गर्भवती राहिल्यानंतर तिच्यावर सांगलीत उपचार सुरु होते.

61 वर्षीय नराधमाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेची प्रसुती, कोल्हापुरात खळबळ
कोल्हापुरात वृद्धाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
| Edited By: | Updated on: Jan 09, 2022 | 7:47 AM

इचलकरंजी : 61 वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करुन तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी हातकणंगले येथील संशयित नंदकुमार चंद्रकांत निगवे याला हातकणंगले पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले दर्गा चौक परिसरात नंदकुमार चंद्रकांत निगवे राहतो. पीडित मुलीच्या इच्छेविरुद्ध त्याने आपल्या नवीन बांधकामावरील पत्र्याच्या शेडमध्ये वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. ती गर्भवती राहिल्यानंतर तिच्यावर सांगलीत उपचार सुरु होते.

पीडितेची प्रसुती

पीडितेची प्रसुती झाली आणि तिने मुलीला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर नातेवाईकांनी सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ती तक्रार हातकणंगले पोलीस ठाण्याकडे नुकतीच वर्ग करण्यात आली आहे. हातकणंगले पोलिसांनी नंदकुमार निगवे याला अटक केली आहे.

ग्रामस्थांकडून याआधी आरोपीची धिंड

नंदकुमार निगवे याने खासगी सावकारीतून अनेक प्रकार केल्याचाही दावा केला जात आहे. त्याच्यावर हातकणंगले पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी नोंद असून संतप्त ग्रामस्थांनी त्याची धिंडही काढली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

संबंधित बातम्या :

पैसे देण्यासाठी फेक पेटीएम अॅपचा वापर, 50 हजार दिल्याचा बनाव करुन काढला पळ, तिघांना बेड्या

मोबाईलवर गेम खेळणे जीवावर बेतले; रागाच्या भरात बापाने केली चिमुकल्याचा हत्या

प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा; मृतदेहाच्या शर्टवरील टेलर मार्कमुळे लागला छडा