Delhi Crime: मोबाईलवर गेम खेळणे जीवावर बेतले; रागाच्या भरात बापाने केली चिमुकल्याचा हत्या

नारायणा अपार्टमेंटमध्ये राहणारा 5 वर्षांचा चिमकुला ज्ञान पांडे उर्फ ​​उत्कर्ष याला मॅक्स हॉस्पिटल साकेतमध्ये उपचारासाठी आणण्यात आले होते. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. हॉस्पिटलने या घटनेची माहिती गुरुवारी नेब सराई पोलीस ठाण्याला दिली.

Delhi Crime: मोबाईलवर गेम खेळणे जीवावर बेतले; रागाच्या भरात बापाने केली चिमुकल्याचा हत्या
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 1:03 AM

नवी दिल्ली : मोबाईलच्या अतिरेकाचे अनेक गैरफायदे निदर्शनास येऊ लागले आहेत. मोबाईलच्या अतिवापराचा मुलांच्या दृष्टीवर विपरीत परिणाम होत आहेत. त्यातच अशाच प्रकारे मोबाईलवर गेम खेळण्याने एका चिमुकल्याचा बळी गेल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीमध्ये घडली आहे. 5 वर्षाचा मुलगा सातत्याने मोबाईलवर गेम खेळत असल्याच्या रागातून संतापलेल्या बापाने मुलाला बेदम मारहाण केली. त्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

मारेकरी बापाला पोलिसांनी केले जेरबंद

दक्षिण दिल्लीतील नेब सराई येथे ही घटना घडल्याचे समोर आले आहे. येथील एका नागरिकाने आपल्या 5 वर्षांच्या मुलाला मोबाईलवर गेम खेळताना पाहिले. मुलगा अभ्यासाकडे दुर्लक्ष करून सातत्याने मोबाईलवर गेम खेळत आहे. त्याची समजूत काढूनही त्याच्या हातातील मोबाईल खाली ठेवला जात नाही. या रागातून आरोपीने आपल्या 5 वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली. याप्रकरणी आरोपी बापाला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

नारायणा अपार्टमेंटमध्ये राहणारा 5 वर्षांचा चिमकुला ज्ञान पांडे उर्फ ​​उत्कर्ष याला मॅक्स हॉस्पिटल साकेतमध्ये उपचारासाठी आणण्यात आले होते. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. हॉस्पिटलने या घटनेची माहिती गुरुवारी नेब सराई पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली आणि वैद्यकीय अहवाल मागवला. त्यावेळी मुलाच्या आईने रात्री 10 वाजता मुलाला बेशुद्ध अवस्थेत इमर्जंसी वॉर्डमध्ये आणले होते. मुलाच्या मानेच्या उजव्या बाजूला, दोन्ही हात आणि पाय तसेच शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दुखापतींबाबत मुलाच्या पालकांना विचारले असता त्यांनी कोणतीही माहिती दिली नव्हती. त्यांनी घटनेची वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न केला.

चाइल्ड हेल्पलाइनवरील कॉलने पोलिसांनी घटनेची माहिती मिळाली

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एका व्यक्तीने चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. उत्कर्षच्या वडिलांनी त्याला मारहाण केली आणि रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाल्याचे त्या व्यक्तीने पोलिसांना कळवले. त्यानुसार पोलिसांनी शेजाऱ्यांची चौकशी केली. त्यावेळी उत्कर्षला त्याच्या वडिलांनी बेदम मारहाण केल्याचे पोलिसांना समजले. आरोपी आदित्य पांडे (२७) याच्या चौकशीदरम्यान त्याने हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिली. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी एम्सच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आरोपीविरुद्ध कलम ३०२ (हत्या) अन्वये गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. (Father kills son while playing on mobile in Delhi)

इतर बातम्या

Bhiwandi: प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा; मृतदेहाच्या शर्टवरील टेलर मार्कमुळे लागला छडा

Nashik Crime: सहा वर्षांच्या मुलीला फासावर लटकावण्याचा प्रयत्न; बापानेच कृत्य केल्याचे उघड

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.