अल्पवयीन मुलींचा पाठलाग करुन अश्‍लील चिठ्ठी पाठवली, कोल्हापुरात तिघांना अटक

| Updated on: Aug 18, 2021 | 8:33 AM

अल्पवयीन मुलींचा पाठलाग करुन अश्‍लील चिठ्ठी पाठवत त्यांना नाहक त्रास देणाऱ्या पांडुरंग लोंढे, शब्बीर हासुरी, सचिन आरगे या तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.

अल्पवयीन मुलींचा पाठलाग करुन अश्‍लील चिठ्ठी पाठवली, कोल्हापुरात तिघांना अटक
अल्पवयीन मुलींना अश्लील चिठ्ठ्या पाठवणारे तिघे जेरबंद
Follow us on

इचलकरंजी : अल्पवयीन मुलींचा पाठलाग करुन अश्‍लील चिठ्ठी पाठवणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. पीडित बालिकेच्या आईच्या तक्रारीनंतर तरुणांना बेड्या ठोकण्यात आल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहराजवळ चंदूर आभार फाटा परिसरात हा प्रकार घडला.

अल्पवयीन मुलींचा पाठलाग करुन अश्‍लील चिठ्ठी पाठवत त्यांना नाहक त्रास देणाऱ्या पांडुरंग लोंढे, शब्बीर हासुरी, सचिन आरगे या तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. यातील पांडुरंग लोंढे हा संशयित आरोपी वैद्यकीय चाचणीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे त्याला आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर अन्य दोघे – शब्बीर हासुरी आणि सचिन आरगे यांना इचलकरंजी प्रथमवर्ग न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

इचलकरंजी शहरालगतच्या चंदूर आभार फाटा परिसरात एक अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसमवेत राहते. 10 ऑगस्ट रोजी ती आणि तिची मैत्रीण अशा दोघी जणी खेळत होत्या. याच वेळी पांडुरंग लोंढे, शब्बीर हासुरी आणि सचिन आरगे हे तिघे जण तिथे आले. त्यांनी दोघींचा पाठलाग करत त्यांना खाऊचे आमिष दाखवले. त्यानंतर मनात लज्जा उत्पन्न होईल, अशा आशयाच्या अश्‍लील मजकुराच्या चिठ्ठ्या देऊन दमदाटी केल्याचा आरोप आहे. हा सारा प्रकार एका मुलीच्या आईने प्रत्यक्ष पाहिला असून साक्षीदार आणि अन्य एका पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली.

एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह

पांडुरंग लोंढे, शब्बीर हासुरी व सचिन आरगे या तिघांवर विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 12 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांना रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. यातील पांडुरंग लोंढे हा संशयित आरोपी वैद्यकीय चाचणीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असून आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर अन्य दोघे शब्बीर हासुरी, सचिन आरगे यांना इचलकरंजी प्रथमवर्ग न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

संबंधित बातम्या :

विवाहितेच्या अंगावर ‘आय लव्ह यू’ लिहिलेला कागद फेकणं हा विनयभंगच, नागपूर खंडपीठाचा निकाल

टेरेसवर गाणं ऐकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, वर्ध्यात तरुणाला सश्रम कारावासाची शिक्षा