AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bribe | ट्रक सोडण्यासाठी 11 हजारांची लाच, पोलीस उपनिरीक्षक रंगेहाथ जाळ्यात

57 वर्षीय शेख नजीर हुसेन आमिर हजमा हा पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी पोलीस स्टेशनमध्ये त्याची पोस्टिंग आहे. तो नांदेडच्या खडकपुरा भागातील वकील कॉलनीत राहतो.

Bribe | ट्रक सोडण्यासाठी 11 हजारांची लाच, पोलीस उपनिरीक्षक रंगेहाथ जाळ्यात
आरोपी पोलीस उपनिरीक्षकImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 31, 2022 | 11:46 AM
Share

नांदेड : अकरा हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना नांदेडमध्ये (Nanded) पीएसआयला रंगेहाथ पकडले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्याला अटक करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी पोलीस ठाण्यातील ही घटना आहे. पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) शेख नाजीर हुसेन यांना अटक करण्यात आली. गुन्ह्यात जप्त केलेला ट्रक सोडण्यासाठी त्यांनी अकरा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. लाच घेताना पीएसआय हुसेन यांना एसीबीने रंगेहाथ बेड्या ठोकल्या.

कोण आहे आरोपी?

57 वर्षीय शेख नजीर हुसेन आमिर हजमा हा पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी पोलीस स्टेशनमध्ये त्याची पोस्टिंग आहे. तो नांदेडच्या खडकपुरा भागातील वकील कॉलनीत राहतो.

काय आहे आरोप?

आरोपी लोकसेवकाने तक्रारदाराच्या मामा विरुद्ध उमरी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात मदत केली म्हणून आणि गुन्ह्यातील जप्त असलेला ट्रक सोडण्यासाठी 11 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती स्वतः स्वीकारली आहे.

डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद परिक्षेत्र औरंगाबाद अतिरिक्त पदभार नांदेड, धरमसिंग चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक लाप्रवि,नांदेड परिक्षेत्र नांदेड, श्री राजेंद्र पाटील, पोलीस उपअधीक्षक लाप्रवि,नांदेड यांनी तपासात मार्गदर्शन केले.

अशोक इप्पर, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड हे सापळा अधिकारी होते, तर सापळा पथकात पोना एकनाथ गंगातीर्थ, जगन्नाथ अनंतवार, ईश्वर जाधव , शेख मुजीब लाप्रवि नांदेड होते.

संबंधित बातम्या :

PHDच्या विद्यार्थिनीला 25 हजारांची लाच मागितली, डॉ. उज्वला भडंगेंवर आरोप, ऑडिओ क्लिप व्हायरल

कंत्राटदार ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात! 17 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

कल्याणमध्ये नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी महिला तलाठीने पंधरा हजाराची लाच मागितल्याचे निष्पन्न

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...