गजा मारणे, शरद मोहोळनंतर गॅंगस्टर निलेश घायवळला बेड्या, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

कुख्यात गुंड गजा मारणेच्या मुसक्या आवळल्यानंतर आता पुणे पोलिसांनी आणखी (Pune Police Arrest Gangster Nilesh Ghaiwal) एका कुख्यात गुंडाला अटक केली आहे.

गजा मारणे, शरद मोहोळनंतर गॅंगस्टर निलेश घायवळला बेड्या, पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Pune Police Arrest Nilesh Ghaiwal
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 3:19 PM

पुणे : कुख्यात गुंड गजा मारणेच्या मुसक्या आवळल्यानंतर आता पुणे पोलिसांनी आणखी (Pune Police Arrest Gangster Nilesh Ghaiwal) एका कुख्यात गुंडाला अटक केली आहे. पुणे शहर पोलिसांनी गॅंगस्टर निलेश घायवळला मोक्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात विविध प्रकारचे 14 गुन्हे दाखल आहेत (Maharashtra Crime News Pune Police Arrest Gangster Nilesh Ghaiwal In Case Of Mocca).

निलेश घायवळच्या संपूर्ण टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजली आहे. येरवडा कारागृहातूनच पुणे पोलिसांनी निलेश घायवळवर अटकेची कारवाई केली आहे.

निलेश बन्सीलाल घायवळ, संतोष आनंद धुमाळ, मुसाब एलाही शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नुकतीच पुणे ग्रामीण पोलिसांनी निलेश घायवळ याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करत येरवडा कारागृहात रवानगी केली होती.

पुणे पोलिसांनी शरद मोहोळच्याही मुसक्या आवळल्या

कुख्यात गुंड शरद मोहोळच्याही मुसक्या पुणे पोलिसांनी आवळल्या आहेत. शनिवारी (6 मार्च) सातारा पोलिसांनी गजा मारणेला अटक केली होती. त्यानंतर रविवारी (7 मार्च) शरद मोहोळला बेड्या ठोकल्या आहेत. 26 जानेवारीला शरद मोहोळने हजेरी लावलेल्या कार्यक्रमात धांगडधिंगा केल्याप्रकरणी त्याच्यावर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद मोहोळला पुढील दोन महिने पुणे शहरात राहण्यास बंदी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी शरद मोहोळला दोन महिन्यांसाठी वास्तव्य करण्यास आणि प्रवेश करण्यास मनाई केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

कारवाईचे कारण

15 दिवसांपूर्वीच शहरातला मोहोळ टोळीचा म्होरक्या शरद मोहोळ याची कातिल सिद्दिकीच्या खुनातून मुक्तता झाल्यानंतर मोहोळ टोळीनेही मारणे टोळीसारखाच ‘धुरळा’ केला होता. मात्र त्यावेळी पुणे पोलिसांनी काहीही कारवाई केली नव्हती (Maharashtra Crime News Pune Police Arrest Gangster Nilesh Ghaiwal In Case Of Mocca).

गजा मारणेला सातारा पोलिसांच्या बेड्या

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेला कुख्यात गुंड गजा मारणेला (Gajanan marne) सातारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मेढा पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करुन गजा मारणेला जेरबंद केलं आहे. क्रेटा गाडीतून त्याची जावळी-महाबळेश्वरात हवा चालली होती. अखेर सातारा पोलिसांना त्याची चाहूल लागताच पोलिसांनी अगदी शिताफीने त्याला बेड्या ठोकल्या. गजा मारणेवर खून, मारामारी, खंडणी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद आहेत

पुणे पोलिसांना गुंगारा देऊन त्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला होता. गेल्या अनेक दिवस पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर साताऱ्याच्या जावळी तालुक्यातून गजा मारणेला मेढा पोलिसांनी अटक केली आहे.

Maharashtra Crime News Pune Police Arrest Gangster Nilesh Ghaiwal In Case Of Mocca

संबंधित बातम्या :

गजा मारणे पाठोपाठ गुंड शरद मोहोळच्या मुसक्या आवळल्या, पुण्यात येण्यास बंदी

जावळी-महाबळेश्वरात ‘क्रेटा’मधून हवा, फिल्मी स्टाईल पाठलाग करुन गजा मारणेला सातारा पोलिसांच्या बेड्या

गजा मारणेच्या नऊ साथीदारांना बेड्या, हिंजवडी पोलिसांची धडक कारवाई

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.